भाजपाला खरी ही भिती? म्हणूनचं हेतू:हा आमित शहांनी ठाकरे-पवारांवर हल्ला करत विधानसभा ‘लाईन’ ठरवली?

0

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला जोरदार फटका बसल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागताच भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना हेतू:हा लक्ष केले जात आहे. यामागे भारतीय जनता पक्षाची सोचीसमजी चाल असून भाजपला खरी भिती हिंदुत्ववादी मतांची आहे! महाराष्ट्रांमध्ये सध्या हिंदुत्ववादी मते भाजपा, शिवसेना (UBT), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना(एकनाथ शिंदे) या चार पक्षांमध्ये विभागली जाणार असली तरी खरे मत विभाजन भाजपा, शिवसेना (UBT) यांच्यातच आहे. त्यातच शरद पवार यांनी 2014 पासून भाजपकडे सलगी केलेल्या नेत्यांच्या मतदारसंघाकडे मोर्चा वळवल्यामुळे भारतीय जनता पक्षाची दुहेरी अडचण झाली आहे. त्यामुळेच ठाकरे-पवारांवरच राजकीय हल्ले तीव्र होऊ लागले आहेत. महाराष्ट्र भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात पार पडले. या अधिवेशनातूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. भाजपकडून अजित पवार बंडापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उल्लेख नॅशनल करप्ट पार्टी असा केला जात होता. मात्र, अजित पवार महायुतीत सामील झाल्याने हा मुद्दा बाजूला टाकला गेला होता. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून शरद पवारांना लक्ष्य केले जाणार, हे अमित शाह यांच्या भूमिकेनंतर स्पष्ट झाले आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

अमित शाह शरद पवारांबद्दल काय बोलले?

“भ्रष्टाचाऱ्याच्या गोष्टी करताहेत. भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा म्होरक्या भारतीय राजकारणात कुणी असेल, तर ते शरद पवार आहेत. याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचाराला कायदेशीर करण्याचे काम जर कुणी केलं असेल, तर शरद पवार ते तुम्ही केलं आहे. हे मी ठणकावून सांगतो.”

अमित शाह यांचे हे विधान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपला शरद पवारांना किंवा त्यांच्या पक्षाला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष्य करता आले नाही. ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अजित पवाराच सोबत असल्याने भाजपची अडचण झाल्याचे दिसले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

यापूर्वी भाजपने थेट शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले नव्हते. मात्र, यावेळी प्रथमच पवारांना भ्रष्टाचारात खेचण्यात आले आहे. शरद पवारांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचे काम केले, असे सांगत शाहांनी शरद पवारांना भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा म्होरक्या असा उल्लेख केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपकडून याच मुद्द्यावर राष्ट्रवादीला लक्ष्य केले जाणार, हे स्पष्ट दिसत आहे.

ठाकरेंपासून हिंदुत्ववादी मते दूर ढकलण्याची रणनीती?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना त्यांना औरंगजेब फॅन क्लबचे नेते म्हटले. लोकसभा निवडणूक निकालापासून ठाकरेंना मुस्लिमांचे नेते ठरवण्याचे प्रयत्न भाजपकडून होत असल्याचे दिसत आहे. ठाकरेंचे उमेदवार मुस्लीम मतांवर निवडून आले, असे दावे भाजपच्या नेत्यांनी केले. त्यात आता शाहांनी ठाकरेंबद्दल एक भाष्य करत प्रचाराची लाईन निश्चित केल्याचे दिसत आहे. यातून हिंदुत्ववादी मते ठाकरेंच्या शिवसेनेपासून दूर नेण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

अमित शाह उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलले?

 “देशाची सुरक्षा औरंगजेब फॅन क्लब सुनिश्चित करू शकत नाही. औरंगजेब फॅन क्लब कोण आहे? आघाडीवाले आहेत. त्यांचा नेता कोण आहे? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले आहेत. तःला बाळासाहेब ठाकरेंचा वारसादार सांगणारे उद्धवजी, कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत. उद्धवजी, याकूब मेननला सोडण्याची मागणी करणाऱ्यांसोबत तुम्ही बसले आहात.”

“झाकीर नाईकला मेसेंजर ऑफ पीस बनवणाऱ्यांच्या मांडीवर उद्धवजी तुम्ही बसला आहात. पीएफआयला पाठिंबा देणाऱ्यांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात. संभाजीनगरचा विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे तुम्ही बसला आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, असे अमित शाह म्हणाले.