राज्यात महायुतीचं सरकार येईल असे शिवसेना भाजप आणि मित्रपक्ष म्हणत असताना खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र सलग तीन वेळा आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मतदारसंघावरती अजित पवार गटाच्या वतीने दावा सांगण्यात आला आहे. विशेष म्हणजे सलग तीन वेळा राष्ट्रवादी आणि भाजप अशी थेट लढत होऊनही पुन्हा एकदा खडकवासला आपणच विजय होऊ असा आत्मविश्वास स्थानिक पदाधिकारी यांना निर्माण झाला असून त्यांनी आपली मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त केली आहे.
खडकवासला विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवक यांनी त्यांची जाउन सदीच्छा भेट घेतली. गुरुपौर्णिमा वाढदिवसाच्या निमिताने सर्वानी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच शुभेच्छा देत असताना या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये खडकवासला विधानसभा मतदार संघ हा महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार मतदार संघात देण्यात यावा अशी विनंती सर्वाच्या वतीने एकमताने करण्यात आली.
खडकवासला सर करणे ही अजित पवार यांची मनीषा असून सामूहिक निवेदनामुळे दादांनी एक सकारात्मक प्रतिसाद दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील खडकवासला मतदार संघातील सर्व प्रमुख पदाधिकारी व मा.नगरसेवक यांनी एकत्रित येऊन होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघ आपल्या राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाना मिळावा असा प्रस्ताव मांडण्याची मागणी केली असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांनी दिली.
खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात हा मतदारसंघ असला तरी पक्षांतर्गत असलेला वाद आणि विरोधकांची एकी न होणे यामुळे आजपर्यंत भारतीय जनता पक्ष या मतदारसंघांमध्ये विजयी झाला आहे. मुळात 2019 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तगडी लढत देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयश्री खेचून आणली होती. आता आता विरोधक असलेली सर्व ताकद अजित पवार यांच्या पाठीमागे असून हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक हाती विजय मिळवेल असा विश्वास यावेळी अजित पवार यांना देण्यात आला आहे.
या बैठकीला १ ) सौ. रुपालीलाई चाकणकर २) श्री. प्रदीप उर्फ बाबा धुमाल ३) श्री. दिलीप बराटे ४) श्री. दताक्य धनकवडे 5) श्री. विजय आप्पा रेणुसे 6)श्री. शुक्राचार्य वांजळे ७) श्री. विकास दांगट ८) श्री. अक्ररशेठ कुदळे ले १) श्री. शैलेश चरवड १०) प्रवीण शिंदे ११) सौ सायली वांजळे १२) सौ दिपाली धुमाळ १२) सौ सुनिता पायगुडे १४) श्री युवराज येलदरे १५) श्री प्रकाश कदम (१६) श्री शंकर उर्फ बंडू कमसे १७) सौ अश्विनी आागवत १८) श्री सागर भागबार १९) श्री राजेंद्र पवार. २०) श्री बाळासाहेब कापरे २१) श्री दिवाकर पोकळे २२) श्री मयूरेश मांजळे असे पदाधिकारी उपस्थित होते.