कोथरुड विधानसभा अजितदादांचा हुकमी एक्का विजय ‘बाप्पू’ मैदानात; ‘वंचिताचे’आश्वासक शक्तिकेंद्र सक्रीय!

0

कोथरूड म्हटलं की विशिष्ट समुदायाचा बालेकिल्ला ही वरवरची समज! हिंदुत्ववादी विचार अन् तिचं विचारधारा ही कोथरूडची ओळख काही विशिष्ट समुदायाने आपले लागेबांधे जोपासले पण जनतेबरोबर आघाडी अन् जनतेशीच माझी युती! सुजाण जनता खंबीर पाठीशी मग काय कुणाची भिती… ! याच विचाराने हिंदुत्वाच्या तळागाळातील वंचित शोषित समुदायाचा चेहरा आणि समुदायाच्या वेदना शासन दरबारी पोहोचवण्याचं काम अविरत करणारे नाव म्हटलं की एक नाव नक्की घ्यावंच लागतं ते म्हणजे ….विजय उर्फ बापू डाकले!

कोथरुड विधानसभेत अजितदादांचा हुकमी एक्का म्हणून विजय ‘बाप्पू’ डाकले यांचे नाव घेतलं जाते. उपमुख्यमंत्री अजितदादांचा खास माणूस ओळखं झाली तरी सामाजिक दायित्वाचा आणि जाणिवेचा हा वटवृक्ष बहरतच आहे. फक्त मातंग हरिजन या समुदायापुरता मर्यादित न राहता कुणबी ओबीसी मुस्लिम आणि पारंपरिक हिंदुत्ववादी समुदायांमध्येही विजय बापू डाकले यांचं नाव एक वेगळ्या स्तरात चर्चेले जाते. लोकनेत्याप्रमाणे विनम्र काम करणारे व्यक्तिमत्व विजय ‘बापू’ डाकले आज वाढदिवसाच्या निमीत्ताने विधानसभा मैदानात उतरलं असून ‘वंचिताचे’आश्वासक शक्तिकेंद्र सक्रीय झाल्याने कोथरूड विधानसभेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

एखाद्या चित्रपटाला शोभावा असा खडतर जीवनपट पण त्याचा कुठेही लवलेश न ठेवता किंवा त्याचे भांडवल करत रडत न बसता आपल्या समाजाचा विकास हेच उद्दिष्ट ठेवून गेली तीन दशकं दलित समुदायातील (मातंग हरिजन आणि उपेक्षित सर्व समुदाय) कष्टकरी आणि शोषित चेहऱ्यावरती आनंद फुलवण्यासाठी जीवाचं रान करणार व्यक्तिमत्व म्हणून बाप्पू या नावाकडे आज पाहिले जाते. हेचं बहुजनांच उभारतं नेतृत्व आपला वाढदिवस साजरा करत आहे तेही ‘सामजिक जाणीव’ जपतच!

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

हिंदुत्व ही कोथरूडची ओळख एखादा कार्यकर्ता या भागातून घडत असेल तर त्याने याची कास धरली नाही असे कधी घडलेच नाही कधीकाळी कार्यकर्ता घडतांना हिंदुत्ववादी असतो तर किंवा असंख्य दिवस काम केल्यानंतरही पदरी काय पडत नाही म्हणून हिंदुत्ववादी विचाराला स्वीकारणं ही खरी कोथरूडची ओळख! याच विचारसरणीतून विजयबापू डाकले  यांनी सुरुवातीला पतीत पावन संघटनेच्या मार्फत या भागामध्ये सामाजिक कार्याला सुरुवात केली. आपल्या दाराच्या समोर असलेला अवाढव्य कचरा डेपो पण त्यातून नित्य होणारा त्रास या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि आजपर्यंत अविरत सुरू आहे! हिंदुत्ववादी विचाराने प्रेरित होऊन असंख्य आंदोलने केली काही वेळा तुरुंगवारीही झाली. पण आपल्या समाजाच्या समस्या सोडवणे हेच ध्येय असल्यामुळे कधीही त्यामध्ये खंड न पडता आजतागायत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत राहण्याचे काम बापू डाकले यांनी केलं आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

निर्मळ मनाने विजय डाकले अविरतपणे काम करत होतेच परंतु त्यांना समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी एका भक्कम साथीची गरज होती अन् महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने ती मिळाली. समाजाच्या यातना सोडवण्यासाठी आपल्या हिंदुत्ववादी विचारांशी निष्ठ राहत विजय बापू डाकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यातील नेतृत्व गुण संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांचा राबता याचा विचार करून निर्मळ मनाच्या कार्यकर्त्यावर अजितदादा पवार यांची दृष्टी पडली. प्रभागात काम करणारा हा कार्यकर्ता विधानसभा अध्यक्ष अन खरी विकासाची कास मिळाली ती पुणे शहर सामाजिक न्याय विभागाची अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतरच! पुणे शहर सामाजिक न्याय विभागाचे काम करत असताना संपूर्ण पुणे शहरात दलित आणि मातंग या दोन समुदायांना एकत्र करण्याचे काम विजयबापू डाकले यांनी केले आणि या नेतृत्वाला खरे पैलू पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष(राज्य मंत्री दर्जा) म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर संपूर्ण पुणे शहरातून वंचित समाजाच्या एकीसाठी त्याचा फायदा होईल ही गोष्ट लक्षात घेऊन आजही अविरत दलित व मातंग समाजाच्या समस्या जाणून घेत त्यांच्या आयुष्यामध्ये विकासात्मक बदल करण्याचे काम आजही विजय उर्फ बापू डाकले करत आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार 2019 मध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघाची तयारीही करण्यात आली होती. परंतु वरिष्ठ पातळीवरून झालेल्या निर्णयामुळे मित्र पक्षाचे काम करत पक्षाचे विचारधारा जोपासण्याचे काम आजही विजयबाप्पू डाकले यांच्याकडून केले जात आहे. सामाजिक उपक्रमाचा आणि जाणिवेचा हा वटवृक्ष आज फक्त मातंग आणि हरिजन या दोन समुदायापुरता मर्यादित न राहता यामध्ये कुणबी ओबीसी मुस्लिम आणि पारंपरिक विचारसरणी असलेल्या हिंदुत्ववादी समुदायांमध्येही विजय बापू डाकले यांचं नाव एक वेगळ्या स्तरावरती चर्चेले जात आहे. सामाजिक काम करत असताना कोणत्याही पक्षाच्या जातीच्या भिंती न पाळता एखाद्या लोकनेत्याप्रमाणे विनम्र काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून विजय बापू डाकले यांच्याकडे पाहिले जात आहे.

कोथरूड हा आता बाल्लेकिल्ला राहिला नसून हा बहुजन कष्टकरी आणि वंचित-शोषित यांच्या रोजी रोटी साठी हक्काचे आश्रय असलेला भाग बनत असून या समुदायाच्या समस्या जाणून घेण्यापेक्षा या लोकांना मोफत आणि घरपोच सोयी सुविधा देण्याकडे अनेक प्रतिष्ठित आणि घराणेबाज नेतृत्वाचा कल वाढत पण यातून समाज फक्त जगून निघेल विकास साध्य होणार नाही याची जाणीव मनात धरून विजय डाकले हे नेतृत्व अविरत बहुजनांच्या चेतना जाणीव आणि स्वाभिमान जागृत ठेवण्याचे काम करत आहे.