विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. त्यामुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच मराठ्यांना आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज करण्याची मुभा नाकारली आहे, अशी माहिती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाला हा मोठा धक्का मानला जात आहे.






मनोज जरांगे पाटील राज्यात जनसंवाद रॅली काढत आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मराठ्यांना तीन-तीन ठिकाणी आरक्षण कसे असा प्रश्न माननीय उच्च न्यायालयातही मराठा आरक्षणाच्या केसमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर सार्वजनिकपणे देखील बोलून दाखवला होता त्याआधारे आज आर्थिक दुर्बल वर्गातील ews विद्यार्थ्यांना एक मोठे यश आले आहे. लोकसेवा आयोगाने मराठ्यांना आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज करण्याची मुभा नाकारली आहे, असा दावा सदावर्तेंनी केला आहे.
आज लोकसेवा आयोगाने स्पष्टपणे सांगितलं आहे, मराठा समाजाला आता आर्थिक दुर्बल घटकामध्ये जे केंद्र सरकारने दिलं आहे. त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण घेता येणार नाही. 10 मधील 7 जागा मराठा समाजाला मिळत होत्या, आता जे खरे गरीब आहे. मोदी सरकारने जे आर्थिक दुर्बल घटकांच्या गरिबांसाठी दिले होते. त्यांना लागू होणार आहे, त्यामुळे हा त्या घटकाला मोठा दिलासा आहे, असंही सदावर्ते म्हणाले.
सदावर्ते यांचा युक्तीवाद काय होता?
मराठ्यांना तीन पद्धतीने आरक्षण दिले जात आहे. EWS, OBC आणि विद्यमान सरकारने दिलेलं 10 टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाज घेत आहे. एक मराठा पण तीन ठिकाणी आरक्षण घेत आहे. ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी असा युक्तिवाद उच्च न्यायालयात केला होता. सदावर्ते यांचा युक्तिवाद कोर्टानं तेव्हा मान्य केला होता. या मुद्द्यांवर नव्यानं रीट याचिका दाखल करण्यास परवानगी दिली होती.











