छगन भुजबळ यांनी आज मुंबईतील सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात भुजबळ यांनी पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आज भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. अखेर पत्रकार परिषद घेत भुजबळ यांनी मौन सोडले.






बारामती येथील जन सन्मान रॅली कार्यक्रमामध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांनी आरक्षणासारख्या सामाजिक प्रश्नावर पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी आज पवारांची भेट घेतली.










