निवडणूक निकालावर केजरीवालांचे मोठे वक्तव्य विरोधी पक्षाची भूमिका निभावणार नाही तर लोकांमध्येही राहून आणि त्यांची…

0

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालामध्ये भाजपाने 27 वर्षांनंतर दिल्लीत कमळ फुलवले आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे 2020 प्रमाणेच काँग्रेसला यंदाही भोपळा फोडता आलेला नाही.तर दुसरीकडे आपचे दोन मोठे नेते म्हणजेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अंतिम आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. मात्र भाजपाने या निवडणुकीत बहुमताचा आकडा पार करत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांनी पराभव मान्य करत या निवडणूक निकालावर भाष्य केले आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, आम्ही जनतेचा जनादेश मोठ्या नम्रतेने स्वीकारतो. या विजयाबद्दल मी भाजपाचे अभिनंदन करतो आणि आशा करतो की लोकांनी ज्या आश्वासनांसाठी त्यांना मतदान केले आहे, ते सर्व ते (भाजपा) पूर्ण करतील. परंतु गेल्या 10 वर्षांत आम्ही आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खूप काम केले आहे. त्यामुळे आता आम्ही फक्त विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर लोकांमध्येही राहून आणि त्यांची सेवा करत राहू, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार