ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग

0
2

येस बँक आणि IDFC फर्स्ट बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 1 मे पासून या बँकांच्या ग्राहकांना बिले भरण्यासाठी जास्त रक्कम भरावी लागणार आहे. येस बँक आणि IDFC बँकेने अलीकडेच जाहीर केले की ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटवर 1 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. म्हणजेच, जर तुमचे वीज बिल 15,000 रुपये असेल आणि तुम्ही येस बँक आणि ICFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला अतिरिक्त 15 रुपये द्यावे लागतील.

येस बँक किंवा आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना प्रत्येक बिल पेमेंटवर अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल, असे नाही, यासाठी बँकांनी मर्यादा निश्चित केली आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

अहवालानुसार, येस बँकेच्या ग्राहकांनी त्यांच्या कार्डद्वारे 15,000 रुपयांपेक्षा कमी बिल पेमेंट केल्यास त्यावर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही आणि यापेक्षा जास्त पैसे भरल्यास 1 टक्के दराने अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

या प्रकरणात, IDFC फर्स्ट बँकेने त्याची मर्यादा 20,000 रुपये निश्चित केली आहे. याशिवाय दोन्ही बँका 18 टक्के जीएसटीही लावणार आहेत.

बँका हे शुल्क का आकारत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच MDR कमी आहे. MDR शुल्क म्हणजे पेमेंट गेटवे प्रत्येक क्रेडिट कार्ड व्यवहारावर कंपन्यांकडून शुल्क आकारतात. युटिलिटी बिल पेमेंटमधील MDR इतर श्रेणींपेक्षा कमी आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिले भरता तेव्हा बँकांना कमी कमाई होते. अशी भीती देखील आहे की काही कंपन्या त्यांच्या व्यवसायाशी संबंधित युटिलिटी बिले भरण्यासाठी वैयक्तिक क्रेडिट कार्डचा गैरवापर करू शकतात.

साधारणपणे, कोणत्याही घराचे युटिलिटी बिल वैयक्तिक कार्डावरील क्रेडिट मर्यादेपेक्षा कमी असते. अशा परिस्थितीत कंपन्या त्याचा फायदा घेऊ शकतात. अतिरिक्त शुल्कामुळे यावर आळा बसेल.