नाशिकमध्ये अर्ज भरुन खळबळ उडवणाऱ्या शांतीगिरी महाराजांची संपत्ती किती? वाढीचा वेग डोळे विस्फारतील 

0

शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याचा दावा करत जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतीगिरी महाराज यांनी एकच खळबळ उडवून दिली. महायुतीत उमेदवारीवरुन घोळ असताना महाराजांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी अर्जात पक्षाच्या पुढे शिवसेना असा उल्लेख केल्यानं महायुतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. आपल्याकडे पक्षाचा एबी फॉर्म नसल्याचं सांगितलं. प्रभू रामचंद्र सगळं काही व्यवस्थित करतील, असा आशावाद त्यांनी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना ३ मेपर्यंत एबी फॉर्म सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उमेदवारी दाखल करत नाशिकमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या शांतीगिरी महाराजांच्या संपत्तीचा आकडा डोळे विस्फारुन टाकणारा आहे. गेल्या १५ वर्षांत त्यांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे. २००९ मध्ये महाराजांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीचं मूल्य केवळ ७१ लाख ३९ हजार १५४ रुपये होतं. आताच्या घडीला महाराजांची संपत्ती तब्बल ३९ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. म्हणजेच गेल्या १५ वर्षांमध्ये शांतीगिरी महाराजांची संपत्ती तब्बल ३८ कोटी रुपयांनी वाढली आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

वेरुळ गावात शांतीगिरी महाराजांचा मठ आहे. जनार्दन स्वामी यांचं निर्वाण झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शांतीगिरी महाराजांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्याकडे असलेल्या वाहनांचं मूल्य ६७ लाख ९१ हजार ४८६ रुपये इतकं आहे. त्यांच्यावर ७५ हजारांचं पीक कर्ज आहे. शांतीगिरी महाराज यांच्या जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांवर आहे.

महाराजांची संपत्ती किती आणि कुठे?

मौजे वेरुळ खुलताबादमध्ये २ एकर १ गुंठा जमीन- बाजारमूल्य ४,१३,४७,८०० रुपये

मौजे वेरुळ खुलताबादमध्ये १ एकर २६ गुंठे जमीन- बाजारमूल्य ३,४९,८६,६०० रुपये

मौजे वेरुळ खुलताबादमध्ये १० एकर ४ गुंठे जमीन- बाजारमूल्य २१,४१,६०,४०० रुपये

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

लाखलगाव (नाशिक) ६ एकर ३० गुंठे जमीन- बाजारमूल्य ८७,४८,००० रुपये

शिवडी निफाड ८ एकर ७ गुंठे जमीन- बाजारमूल्य ६८,७४,८०० रुपये