सोलापूरात थेट आत्ता मोदीच मैदानात; लढत कडवी होताच 3 जागी सातपुते, निंबाळकरांसाठी ही खास मोहीम

0

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी 30 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर शहरातील मरीआई चौकातील भंडारी मैदानावर सभा होणार आहे. माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी माळशिरस येथे दुपारी पावणे तीनच्या सुमारास सभा आयोजित केली आहे.

माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या ह्या सभा ३० एप्रिल रोजी माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात होणार आहेत. या सभांचा फायदा किती होणार, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत भाजप उमेदवारांपुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी कडवे आव्हान उभे केले आहे, त्यामुळे स्थानिक नेतृत्वाचा मोदींच्या दोन सभांसाठी आग्रह होता, त्यामुळे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी मोदींच्या दोन स्वतंत्र सभा होणार आहेत. मागील २०१९ च्या निवडणुकीत मोदी यांची अकलूज येथेच फक्त एक सभा झाली होती.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी ३० एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर शहरातील मरीआई चौकातील भंडारी मैदानावर सभा होणार आहे. माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी माळशिरस येथे दुपारी पावणे तीनच्या सुमारास सभा आयोजित केली आहे, अशी माहिती सोलापूरचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी दिली.

सोलापूरच्या होम मैदानावर २०१४ मध्ये शरद बनसोडे यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी अकलूज येथे सभा घेतली होती. यंदा मात्र माढ्यात मोहिते पाटील यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, त्यांनी निंबाळकर यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे. याच मोहिते पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निंबाळकर यांना एक लाखाचे मताधिक्य दिले होते.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांना आव्हान दिले आहे. या मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार असूनही शिंदे यांनी सातपुते यांच्याशी निकराची लढाई सुरू केली आहे. त्यामुळे दोन्ही लोकसभा मतदारसंघात अस्तित्व पणाला लागलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मोदींच्या सभांसाठी आग्रह धरला आहे. त्यातून ३० एप्रिल रोजी सकाळी आणि दुपारी सोलापूर आणि माळशिरस येथे मोदी यांच्या सभा होणार आहेत.

साताऱ्यातील सभेचा निंबाळकरांनाही फायदा

माढा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी माळशिरस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. त्या सभेनंतर ते सातारा येथे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी सभा घेणार आहेत. सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत, त्यामुळे साताऱ्यातील सभेचा माढ्याच्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो, असे भाजपकडून सांगण्यात आले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा