पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त नारायण सुर्वे साहित्यकला अकादमी यांच्यावतीने १५ ऑक्टोबर रोजी नेरळ येथील नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या काव्यजागर संमेलनात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी राजेंद्र वाघ यांच्या श्रमिकांचं गोंदण या काव्यसंग्रहाला नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.






याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा लक्ष्मीकांत देशमुख,मनोहर पारळकर , डॉ. संभाजी मलघे, मुरलीधर साठे, अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, पुरुषोत्तम सदाफुले, नारायण सुर्वे यांची कन्या कल्पनाताई घारे, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कामगार भूषण राजेंद्र वाघ यांचे जीवन, मशाल, निर्भय, श्रमिकांचं गोंदण काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. श्रमिक जगत, सामाजिक विषमता, पर्यावरण, निसर्ग, लोकशाही आणि माणूस , अंधश्रद्धा अशा अनेक विविध विषयावर राजेंद्र वाघ यांनी परखड लेखन केले आहे. कविता सादरीकरणाची स्वतःची विशेष शैली म्हणून महाराष्ट्रातील नामवंत कामगार साहित्यिक म्हणून राजेंद्र वाघ परिचित आहेत.











