पुण्यामध्ये AISCA (All Iconic Senior Citizens Association) संस्थेतर्फे आम्ही आनंदयात्री कार्यक्रम खूपच दिमाखदार व उत्साहात पार पडला यामध्ये पुण्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक ग्रुप्सनी भाग घेतला होता कार्यक्रमाचे आयोजन व नेतृत्व संचालिका शकीला शेख यांनी केले. या कार्यक्रमाला सौ माई उर्फ उषा ढोरे माजी महापौर, श्रीयुत मनोज सेठिया सिटी इंजिनियर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रसिद्ध गायक रवींद्र शाळु आणि कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.






कार्यक्रमाची सुरुवात हमको मन की शक्ती देना या प्रार्थना गीताने संस्थेच्या समन्वयक सौ सुनीला कविटकर व सौ स्मिता वाघ यांनी केली. या कार्यक्रमात ज्येष्ठांनी केलेल्या नृत्य आणि सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले होते ज्यामध्ये अनेक जणांनी भाग घेतला होता व आपली सुंदर कला प्रदर्शित केली ज्याला दर्शकांनी सुद्धा अतिशय जोरदार प्रतिसाद दिला.
समूह नृत्य प्रकारात परियों कि टोली ह्या ग्रुपला प्रथम पारितोषिक मिळाले व दुसरे पारितोषिक सहेली ग्रुप यांना मिळाले तर solo आणी couple नृत्य प्रकारात आशा क्षीरसागर यांना प्रथम आणि पांडुरंग क्षत्रिय व सुधाकर बिल्लाडे यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.
सौंदर्य स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक सौ साधना सरपोतदार, द्वितीय पारितोषिक सौ रूपाली अभंग, तृतीय पारितोषिक डॉक्टर अनुराधा गंभीर यांना मिळाले. पुरुष विभागात प्रथम पारितोषिक श्री किशोर सरपोतदार द्वितीय पारितोषिक डॉक्टर श्यामकांत गंभीर यांना मिळाले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अनिता नेवे, माधुरी बिल्लाडे आणि राजलक्ष्मी हवालदार यांनी काम पाहिले .
सुप्रसिद्ध गायक श्री रविंद्र शाळु, श्री मनोज सेठिया, सुनीला कविटकर, स्मिता वाघ यांनी आपल्या गायनाने आलेल्या प्रेक्षकांची खूपच वाहवा मिळवली. कार्यकारणी सदस्य समन्वयक सौ सुनीला कविटकर, स्मिता वाघ, आशा क्षीरसागर, फरीदा सय्यद आणि विजय यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपला हातभार लावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शीतल वाघ यांनी केले.
या कार्यक्रमाला तनवी टूर्स अँड ट्रॅव्हल्स, संघवी ज्वेलर्स, गिट्स फूड्स, सोनरुपम जेम्स अँड ज्वेलरी , खासबाग मिसळ आदी आदी प्रायोजक होते. या कार्यक्रमाला नवचैतन्य हास्य परिवाराचे श्री राम साळुंखे श्रीयुत घुगे श्रीयुत प्रताप साबळे श्रीयुत कमलाकर जाधव आणि बब्रूवाहन वाघ अनेक ग्रुप सदस्यांसहित उपस्थित होते.











