वारजे माळवाडीत उपमुख्यमंत्र्यांचा थेट दौरा; वारजे मोकळा श्वास’ घेणार प्रशासनाला दिल्या तातडीच्या सूचना

0

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील जनसंवाद निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हक्काच्या वारजे माळवाडी भागासाठी सलग दोन दिवस दौरा करत …अगोदर अनुभव आणि नंतर निर्णय असा कार्यक्रम आखत प्रशासनाला सक्त सूचना दिल्याने वारजे माळवाडीतील वाहतूक कोंडीतून सर्वसामान्य नागरिकांची सुटका होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. खडकवासला मतदार संघातील वाहतूक कोंडीच्या दैनंदिन समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहाटे थेट मैदानात उतरले. वारजे माळवाडी, न्यू अहिरेगाव, शिवणे, नांदेड आणि धायरी परिसरातील प्रमुख ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

वारजे माळवाडी परिसरातील वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी पुणे महापालिका विकास आराखड्यातील रस्ते प्रत्यक्षात उतरवण्याशिवाय पर्याय नाही याची जाण लक्षात घेऊन आज सकाळी पहाटे चौधरी उड्डाणपुलापासून पाहणीला शुभारंभ करण्यात आला. पुणे महापालिकेच्या विकासावर खड्यामध्ये रस्ता बाधित झालेल्या 5000 स्क्वेअर फुट च्या आतील नागरिकांना थेट मोबदला देण्याचा धडाकेबाज निर्णय घेण्यात आल्याने वारजे माळवाडी परिसरातील अखेर आकाश नगर ते हायवे व सेवा रस्त्यावरील सर्व जागामालकांचा प्रश्न मार्गी लागला. वारजे माळवाडीतील सेवा रस्त्याचा प्रश्न सोडवत असताना एक महत्त्वाची समस्या अजितदादा पवार यांच्या लक्षात आली. वारजे नदीवरील मुख्य रस्त्यालगत सेवा रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने उड्डाणपूल बनवण्यात आले आहेत; परंतु पुणे महापालिकेच्या वतीने मात्र सेवा रस्ता उड्डाणपूल खंडित केल्यामुळे असल्याने वाहतूक कोंडीची समस्या सोडवणे अशक्यच असल्याची जाणीव झाल्यानंतर तात्काळ नदी पुलावर पुणे महापालिकेच्या वतीने सेवा रस्ता उड्डाणपूल बनवण्याच्या तात्काळ सूचना देण्यात आल्या. याबरोबरच या सेवा रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या स्मशानभूमीचाही धडक निर्णय घेण्यात आला आहे. आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत थेट चर्चा करत अनेक कामांना त्यांनी जागेवरच गती देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पालिका आयुक्त नवल किशोर राम, महिला आयोगाच्या याध्यक्ष रूपाली चाकणकर, दिलीप बराटे, बाबा धुमाळ आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

वारजे माळवाडी चे विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय-

  • वारजे संजीवन खिंड ( डुक्करखिंड)-

पुणे महापालिकेच्या विकासावर खड्यामध्ये रस्ता बाधित झालेल्या 5000 स्क्वेअर फुट च्या आतील नागरिकांना थेट मोबदला देण्याचा धडाकेबाज निर्णय घेण्यात आल्याने वारजे माळवाडी परिसरातील अखेर आकाश नगर ते हायवे व सेवा रस्त्यावरील सर्व जागामालकांचा प्रश्न मार्गी लागला.

– वन विभागच्या हद्दीची संयुक्त मोजणी पूर्ण, हद्द कायम केली नाही, तातडीने हद्द कायम करा उपवनसंरक्षकांना सूचना

– बीडीपी रस्त्यासाठी 0.4 टीडीआरऐवजी 1 एफएसआय देण्याचे निर्देश.

– पुणे महापालिका विकास आराखड्यातील आकाशनगर ते हायवे या रस्त्यालगत असणाऱ्या वनविभाग जमिनीची संयुक्त बैठक घेऊन मोजणीनुसार योग्य उपाययोजना

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

– सेवा रस्त्यासाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला. (5 गुंठे पेक्षा जास्त जमीनधारकांना रोख, त्यापेक्षा जास्त जागा मालकांना टीडीआर/एफएसआय द्या. महापालिकेला तातडीने कार्यवाही करावी)

  • वारजे मुठा नदीपर्यंत डीपी रस्ता –

वारजे नदीवरील मुख्य रस्त्यालगत सेवा रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने उड्डाणपूल बनवण्यात आले आहेत; परंतु पुणे महापालिकेच्या वतीने मात्र सेवा रस्ता उड्डाणपूल खंडित केल्यामुळे असल्याने वाहतूक कोंडीची समस्या सोडवणे अशक्यच असल्याची जाणीव झाल्यानंतर तात्काळ नदी पुलावर पुणे महापालिकेच्या वतीने सेवा रस्ता उड्डाणपूल बनवण्याच्या तात्काळ सूचना देण्यात आल्या.

– डीपी रस्ता पुढे मुठा नदीपर्यंत नेण्याचा निर्णय.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

– नदीवर दोन्ही बाजूंना महापालिकेला सेवा रस्ते साठी पूल बांधण्याच्या सूचना

  • अहिरेगाव – जांभुळवाडी रिंगरोड –

याचा डीपीआर तयार करण्यासाठी पीएमआरडीएला सूचना; बोगदा करता येईल का तपासणी, संरक्षण मंत्र्यांची परवानगी आणू

  • शिवणे-नांदेड पूल आणि नव्या पूलांचे पर्याय –

– धरणालगतचा पूल जुना झाल्याने धोकादायक,

– पालिकेने दुरुस्तीची तयारी पालकमंत्र्यांनी फेटाळली तातडीने नवीन पूल बांधण्याच्या सूचना.

– सध्याचा शिवणे- नांदेड पूल तीन-चार ठिकाणी काटकोनात वळलेला येथे पश्चिमेला जास्त उंचीचा नवीन पूल बांधणे

– कोंढवे-धावडे ते नांदेड सिटी दरम्यान नदीतील अंतर कमी असल्याने पूल बांधण्याचा महापालिकेचा पर्याय

– नांदेड सिटी मुठा नदीवरील पूल आणि दांगट इंडस्ट्रियल इस्टेट (वारजे हद्द) येथे नवा पूल बांधण्याचा महापालिकेचा पर्याय

  • धायरी – बारांगणी मळा ते सिंहगड रस्ता डीपी रस्ता –

जागा संपादन अडथळा, शेतकऱ्यांवर अन्याय न करता रस्ता सुरू करण्याचे निर्देश.