महायुतीचा सर्वात मोठा डाव; हा नेताही हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची ही मोठी ऑफर सध्या चर्चेत?

0

उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांना महायुतीकडून मोठी ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळतेय. दक्षिण मुंबईतून मिलिंद नार्वेकर यांना लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरमुळे मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? की ठाकरे गटाला धक्का देणार? अशा चर्चा सध्या रंगताना दिसतोय. दरम्यान, सध्या दक्षिण मुंबईची जागा ही शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा मिलिंद नार्वेकर शिंदे गटाकडून लढू शकतात, अशी चर्चा आहे.

महायुतीकडून दक्षिण मुंबईत मिलिंद नार्वेकर यांचं नाव चर्चेत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिलिंद नार्वेकर यांना ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. इतकंच नाहीतर शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?