लोकशाहीच्या युद्धात घराघरांत रणधुमाळी; भाऊ-बहिण, नणंद-भावजयीत जुंपली

0

लोकशाहीतील सर्वात मोठ्या युद्धाचा शंखनाद झालेला आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील मतदानाला उद्यापासून 17 एप्रिलपासून सुरुवात पण होत आहे. अनेक राज्यात पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचे पण ढोल वाजवले जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराचा धडका सुरु आहे. स्टार प्रचारकांपासून ते पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येक जण त्यांच्या उमेदवाराचा जमके प्रचार करत आहे. प्रत्येक पक्ष जाहिरनामा, वचनं, आश्वासनांसह जनतेत जात आहेत. लोकशाहीची गोड फळं चाखण्यासाठी घराघरांत, नात्यात सुद्धा सामना रंगला आहे.

घराघरांत रणधुमाळी

महाराष्ट्रापासून ते ओडिशापर्यंत अनेक मतदारसंघात नात्यातील हा सामना पाहायला मिळत आहे. कुठे बहिणीने भावाविरोधात दंड थोपाटले आहेत तर कुठे नणंद-भावजयीत सामना रंगला आहे. 1984 मध्ये अमेठी मतदारसंघात राजीव गांधी यांच्याविरोधात त्यांचे लहान भावाच्या पत्नीने मेनका गांधी यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा पराभव झाला होता.
10 वर्षांपूर्वी 2014 मध्ये बंगालमधील रायगंज मतदारसंघात दिर-वहिणी एकमेकांसमोर होते. काँग्रेसचे प्रियरंजन दासमुंशी यांची पत्नी दीपा दासमुंशी यांना तिकीट मिळाले होते. तर त्यांच्याविरोधात तृणमूलच्या तिकिटावर त्यांचे दीर सत्यरंजन दासमुंशी यांनी निवडणूक लढवली होती

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

येथे तर पती-पत्नीच एकमेकांविरोधात

पश्चिम बंगालमधील बिष्णुपूर लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण देशात चर्चा आहे. येथे तर पती-पत्नीच एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. भाजपने या मतदारसंघात सध्याचे खासदार सौमित्र खान यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने त्यांची माजी पत्नी सुजाता मंडल यांना तिकीट दिले आहे. यापूर्वी खान यांनी टीएमसीच्य श्यामल संत्रा यांना हरवले होते.

महाराष्ट्रात रंगला नात्यात सामना

महाराष्ट्रात दोन मतदारसंघ चर्चेत आहेत. त्यात बारामतीमध्ये NCP शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि त्यांचे बंधू अजित पवार यांच्या गटाच्या आणि त्यांच्या वहिणी सुनेत्रा पवार यांच्यात सामना होत आहे. उस्मानाबादमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ओम राजे निंबाळकर यांना तिकीट दिले आहे. तर भाजपने राणा जगजीतसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अर्चना पाटील या निंबाळकरांच्या नात्याने वहिणी आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

आंध्रमध्ये भाऊ-बहिणीत टक्कर

आंध्र प्रदेशातील कडप्पा या मतदारसंघातही नात्यातील संघर्ष पाहायला मिळेल. कडप्पा मतदारसंघात YSR काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी त्यांचा चुलत भाऊ वाय. एस. अविनाश रेड्डी यांना मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसने या मतदारसंघात जगन मोहन यांची बहिण वाय. एस. शर्मिला यांना तिकीट दिले आहे.

ओडिशात दोन सख्ख्या भावात सामना

ओडिशातील चिकिटी विधानसभा निवडणुकीतही असाच सामना रंगणार आहे. येथे दोन सख्ख्या भावांमध्ये आमदारकीसाठी लढत होत आहे. या मतदारसंघत रविंद्रनाथ द्यान सामंत्रा काँग्रेसच्या तिकिटावर तर त्यांचे बंधू मनोरंजन द्यान सामंत्रा हे भाजपच्या तिकिटावर आमने-सामने आले आहेत. त्यांचे वडील चिंतामणी ज्ञान सामंतराय हे ओडिसा विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती