अखेर ठरले…साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी

0

सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे. अखेर सातारच्या जागेवर भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा होण्याची करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहिर करत उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम असताना उदयनराजेंनी तरी जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला होता. अखेर आज हा तिढा सुटल असून साताऱ्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले अशी थेट लढत असणार आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा