‘मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास देशात लडाख-मणिपूरची परिस्थिती निवडणुकाही होणार नाहीत’: सीतारामचे पती

0

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, देशाचे संविधान बदलेल. मोदी स्वतः लाल किल्ल्यावरून द्वेषपूर्ण भाषण देतील आणि संपूर्ण देशात लडाख-मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल. असा दावा केला आहे.

परकला प्रभाकर यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसने आपल्या X अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्यांना विचारण्यात आले होते की, पीएम मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यास देशात काय बदल होईल?

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

याला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन यांचे पती म्हणाले, “असे झाले तर तुम्ही पुन्हा निवडणुकीची अपेक्षा करू शकत नाही अशी शक्यता आहे. जर हे सरकार 2024 च्या निवडणुकीनंतर परत आले तर नक्कीच निवडणुका होणार नाहीत”

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा