अंबादास दानवेंच्या नव्या विधानाने पुन्हा भुवया उंचावल्या; शिंदेंनी यांनाच उमेदवारी दिली तर चांगलं होईल कारण…

0

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. अशात छत्रपती संभाजीनगरमध्ये घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मतदारसंघात दौरा करत आहेत. यावेळी शिंदे गटाच्या उमेदवारीवर त्यांनी भाष्य केलं आहे. शिवसेना शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावर दानवेंनी भाष्य केलं. संदिपान भुमरे यांचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. आमचा उमेदवार निश्चित होऊन 15 दिवस झालेले आहेत. भुमरे यांचं नाव निश्चित झाल्यास चांगलं आहे. कारण ते आमच्या लोकसभा मतदारसंघातले नाहीत. पुढे कसं करायचं त्यांचं ते आम्ही ठरवू, असं अंबादास दानवे म्हणाले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

निवडणुकीवर भाष्य

सकाळी 7 पासून मी प्रचाराला सुरुवात केली आहे. आतापर्यंत मी पाच ते 7 ठिकाणी गेलो. आज 18 ठिकाणी भेटी देणार आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकनाथ शिंदे शिवसेना चांगल्या पद्धतीने वाचवत आहेत… उमेदवार बदला म्हणायची हिंमत पूर्वी कुणाची नव्हती. आता उमेदवार ठरवायला दिल्लीला जावं लागायतंय. मागच्या वेळी किरीट सोमय्या यांची उमेदवारी शिवसेनेने बदलायला लावली होती. आता शिवसेनेची काय अवस्था आहे, आपल्याला माहिती आहे, असं दानवे यांनी म्हटलं.

शिंदे गटावर निशाणा

तुमच्यासाठी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही उमेदवारी देऊ शकत नाही. तुम्ही काय शिवसेना वाचवणार तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी गेलेला आहेत. भारतीय जनता पार्टी कसं एकेकाचे ऑपरेशन करते हे तुम्हाला लवकर कळेल. गोवा बिहार इथे भाजप कशी वागली आहे. तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचे सुख भाजप उपभोगू देणार नाहीतुम्ही इतके दिवस काम केलं ते काय घरगडी म्हणून काम केलं का? मग याच घरगाड्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नगरविकास खातं दिलं कसं? उध्दव ठाकरे इतरांना सहकारी समजतात. तरीही तुम्ही हे बोलत असाल तर ही नमक हरामी आहे, असं विधान अंबादास दानवे यांनी केलं आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

आशिष शेलारांना प्रत्युत्तर

आशिष शेलार यांनी आज सकाळी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार यांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी लागते नाहीतर त्यांना कुत्रा विचारणार नाही. ठाकरेंवर टीका करण्यासाठी आशिष शेलार यांचं काहीतरी ठरलं असणार आहे. चांगलं काम करतात हे तीन नेते, महाराष्ट्राच्या तिजोरी ची लूट हे तिन्ही नेते करत आहेत. 15 टक्क्यांशिवाय काम करत नाहीत, भूखंड लाटत असतात, हे काम उध्दव ठाकरे यांना करता येत नाही. सलमान खान कलाकार आहे भेटणं काही विशेष नाही, असं दानवे म्हणालेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन