भाजपचा ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणूकीत बडा नेत्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश अन् लगेच उमेदवारीही

0

देशात लोकसभा निवडणूक होत आहे. सगळीकडे निवडणुकीचं वारं वाहतंय. शिवसेना ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. अशातच आता ऐन निवडणूक काळात ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचा बडा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. राजकीय वर्तुळात याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र हा बडा नेता कोण याबाबतची स्पष्टता आलेली नाही. या नेत्याचं नाव कळू शकलेलं नाही.

आज पक्ष प्रवेश

ठाकरे गटाचा बडा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. हा बडा नेता कोण? या नेत्याचं अद्याप समोर आलेलं नाही. मात्र आज सकाळी ठाकरे गटाचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.आज सकाळी 10. 30 वाजता भाजपच्या मुंबईतील नरिमन पॉईंटच्या पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे. नेते नेमका कोण आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

ही मोठी शक्यता

गेली दोन आठवडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये हक्काची आणि प्रबळ दावा करत मराठवाड्यातील एक जागा अजूनही जाहीर करण्यात आले नाही निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये या जागेचा मतदान असल्यामुळे या जागेचा तिढा सुटत नसतानाच भाजपने मोठा डाव साधला आहे. शिवसेना शिंदे गटाचा प्रबळ उमेदवार नसतानाही असलेला दावा आणि स्वपक्षीयांची प्रबळ मागणी याचा मेळ घालण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाच्या पदावरती काम करणारा खास शिलेदारच आपल्या गळाला लावल्या असल्याची चर्चा सुरू आहे. या पक्षप्रवेशानंतर राज्यामध्ये विरोधातील आवाज सत्तेच्या छत्राखाली जाण्याची शक्यता ही आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

त्या’ महिला नेत्याची आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट

काँग्रेसचे नेते, पंजाबचे माजी राज्यापाल, माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनीही काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या देखील भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात घडत आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

ठाकरेंना धक्का; तर भाजपची ताकद वाढणार

लोकसभा निवडणूक होत आहे. भाजप, शिवसेना- शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विरूद्ध काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात यंदा राज्यात थेट लढत होत आहे. लोकसभेची एक-एक जागा महत्वाची आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. अशात जर बडा नेता ठाकरेंना सोडून भाजपमध्ये गेला तर ठाकरेंसाठी तो धक्का असेल तर भाजपची ताकद वाढवणारा असेल.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

(सविस्तर बातमी लवकरच……)