निवडणूक आयोगाचा ‘एक्झिट, ओपिनियन पोल’बाबत मोठा निर्णय; मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत निर्बंध

0

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता ऐन उन्हाळ्यातच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.महायुती व महाविकास आघाडीकडून अनेक जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे काही जागांवरून महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान याच काळात वेगवेगळ्या माध्यम संस्थांकडून निवडणुकांच्या एक्झिट पोल आणि ओपिनिअन पोलबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक 2024 लक्षात घेता 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत एक्झिट पोलवर बंदी असेल. आपल्या आदेशानुसार, भारत निवडणूक आयोगाने 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. या कालावधीत सर्व लोकसभा मतदारसंघात एक्झिट पोलच्या निकालांचे प्रकाशन आणि प्रसारण करण्यास मनाई असेल. राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी सांगितले की, अधिसूचनेनुसार, एक्झिट पोल घेण्यावर आणि एक्झिट पोलचे निकाल वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित करण्यास किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे प्रसारित करण्यावर पूर्ण बंदी असेल.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, ’19 एप्रिल ते 1 जून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत देशात एक्झिट पोलचं (POll) प्रसारण आणि प्रकाशन करण्यास बंदी असणार आहे. मतदान संपेपर्यंत 48 तासांच्या कालावधीत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोणत्याही ओपिनियन पोलचे अंदाज किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मतदान सर्वेक्षणाच्या निकालांसह कोणतीही मतदानासंदर्भातील माहिती प्रदर्शित करण्यावर स्थगिती असेल.”

उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी सांगितले की, “या आदेशाचे उल्लंघन केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. मीडिया संस्थांना निवडणुकीच्या काळात मतदान आणि सर्वेक्षणाचे निकालाचे अंदाज प्रकाशित आणि प्रसारित करता येणार नाहीत. या कालावधीत कोणतीही व्यक्ती राज्यात कोणतेही ओपिनियन पोल घेणार नाही किंवा कोणत्याही ओपिनियन पोलचे निकालाचे अंदाज प्रकाशित किंवा प्रसारित करू शकणार नाही. सार्वत्रिक निवडणुकांच्या बाबतीत मतदानासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या सुरुवातीपासून ते मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत हे निर्बंध कायम राहतील.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन