‘वर्षा’वरील बैठकीत भाजप-शिवसेनेत मध्यरात्री घडामोडी; नेमकी काय चर्चा अन् शिंदे आग्रही जागेबाबत हा निर्णय

0
1

लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जागा वाटपाचा मुहूर्त अजूनही लागत नाही. बैठका, चर्चा सुरु आहेत. अगदी नवी दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर पुन्हा मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे गटातील मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्यात वर्षावर चर्चा झाली. वाद असणाऱ्या जागांवर ही चर्चा झाली. त्यात छत्रपती संभाजी नगर, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

पालघरमध्ये भाजपच्या चिन्हावर गावित

सर्वात पहिले पालघर जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आता पालघरमध्ये शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे याबाबत त्यांनी मुख्यमंत्री यांनी उपमुख्यमंत्री यांच्यासोबत वर्षावर चर्चा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी या लोकसभेच्या जागेसाठी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंत्री उदय सामंत त्यांच्या भावासाठी या जागेचा आग्रह करीत आहे. कोकणात शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे आम्हाला ही जागा दिली तर आम्ही ती जागा जिंकून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त बैठकीत व्यक्त केला.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

सर्वात मोठी खेळी, विनोद पाटील शिवसेनेकडून?

संभाजीनगर बाबत एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी खेळी खेळली जात आहे. एकीकडे मराठा समाज स्वतंत्र उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे मराठा नेते आणि मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत. ते शिंदे गटाकडून संभाजीनगर जागेसाठी इच्छुक आहेत. पण भाजपसुद्धा या जागेवर निवडणुक लढवण्यास आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.

तब्बल तीन तास चालली बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावरून बैठक जवळपास 2.45 मिनिट झाली. त्यानंतर रात्री 1.30 च्या सुमारास देवेंद्र फडणवीस बैठकीतून निघाले. या बैठकीनंतर महायुतीचे अंतिम जागावाटप लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार