पूर्वीचं वाद अन् विरोधातील जिकरीची लढत तरीही समोरं येताच गळाभेट; अनोख्या मैत्रीचं हे चित्र प्रचंड व्हायरल…

0

आयपीएल स्पर्धेची रंगत दिवसागणिक वाढत चालली आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. टॉप चारमध्ये राहण्यासाठी संघांची जोरदार चुरस सुरु झाली आहे. स्पर्धेत दहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यापूर्वीच बऱ्याच घटनांचा उल्लेख केला गेला. खासकरून विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादामुळे या सामन्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहिलं जात होतं. नाणेफेकीचा कौल कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीकडून सलामीला आलेल्या विराट कोहलीने चांगली फलंदाजी केली. 59 चेंडूत नाबाद 83 धावांची खेळी केली. दरम्यान स्ट्रॅटेजिक टाइम आउटवेळी एक वेगळीच अनुभूती प्रेक्षकांना पाहायला मिळाली. विराट कोहली आणि गौतम गंभीर हे दोघांनी गळाभेट घेतली. त्यामुळे प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

मागच्या पर्वात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाला होता. यापूर्वीही काही सिझनमध्ये दोघं एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे या सिझनमध्येही असंच काहीसं बघायला मिळेल अशी क्रीडाप्रेमींना अपेक्षा होती. पण या सर्व शक्यतांवर पाणी फेरलं गेलं आहे. विराट कोहलीने नवीन उल हकनंतर गौतम गंभीर प्रकरणावर पडदा टाकला आहे. नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यातील वाद वनडे वर्ल्डकप स्पर्धेत संपुष्टात आला होता. आता गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वाद संपला आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर क्रीडातज्ज्ञ विराटने उचललेल्या पावलाचं कौतुक करत आहेत. एका युजर्सने लिहिलं की, दोघांमध्ये समेट झाल्याने सर्व मजा निघून गेली आहे. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, बरं झालं..अशी पण नवीन उल हकसोबत दोस्ती झाली होती. आता गंभीरसोबत झाली आहे.