लोकसभेसाठी तयार आहात का?, देवेंद्र फडणवीसांचा जुन्या खासदाराला फोन

0

लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद बनसोडे यांना फोन गेल्याचा दावा खुद्द शरद बनसोडे यांनी केला आहे. सोलापूर लोकसभेसाठी तयार आहात का? देवेंद्र फडणवीसांकडून फोनवर शरद बनसोडे यांना विचारणा करण्यात आली आहे. भाजप आमदारांच्या बैठकीनंतर फडणवीसांनी फोन केल्याचा दावा शरद बनसोडे यांनी केला आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीयांकडून उमेदवारी चाचपणी सुरु आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत. माजी खासदार शरद बनसोडे यांनी पुन्हा एकदा आपला पत्ता टाकून, उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली. महत्त्वाचं म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला फोन करुन माहिती घेतल्याचा दावा, शरद बनसोडे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

शरद बनसोडे हे 2014 मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडून खासदार झाले होते. त्यांनी त्यावेळी तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. यानंतर 2019 च्या निवडणुकीत भाजपने शरद बनसोडे यांचं तिकीट कापून जयसिद्धेश्वर स्वामी यांना तिकीट दिलं होतं. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपनं मागील दोन निवडणुकांमध्ये बाजी मारली आहे.