मोदींचा रथ तुमच्या गावात आला तर आता आडवा,आता मोदी आणि आपण समान आहोत, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे. ते हिंगोलीच्या सभेत बोलत होते. तहान भूक हरपून सगळेजण भाजपला तडीपार करण्यासाठी कामाला लागलेत.मी लोकांच्या सभा ऐकून महाराष्ट्र भर फिरतोय,महाराष्ट्र मला कुटुंबातील सदस्य मानतात,जे पण करतोय त्यांना सांगतोय. कालच्या सभेत माझ्यावर टीका झाली. काही मोदी भक्त म्हणतायेत उद्धव ठाकरेंची भाषा बदलली. भाजपच्या खूळखुळ्यांनो आम्ही देशप्रेमी आहोत आणि तुम्ही मोदी भक्त आहात, असे ते म्हणाले.






परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपलं मूळ सोडलं नाही. ते अडचणीत शिवसेनेबरोबर उभे राहिलेत. पहिल्या वेळी हिंगोली आणि परभणी ह्या दोन लोकसभा मधून दोन खासदार निवडून दिले होते. पण येथे विद्यमान खासदार सोडून देण्याची परंपरा होती, वसमतचा 100 कोटींचा हळद संशोधन प्रकल्प मी दिला. यांना आमदार खासदार केलं. मंत्री केलं पण यांची भूक मागत नाही. यांनी लाज लज्जा सोडली. गद्दारी करणाराऱ्यांना लाज नाही, असेही ते म्हणाले.
धनुष्यबाण चोरांच्या हाती आहे. आता सर्वोच्च न्यायालयाकडून आपल्या न्यायाची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांचा फोटो लावल्यावरून अजित पवारांवर फटकारले होते. यावरुन उद्धव ठाकरेंनीदेखील बेशरम अवलाद म्हणत अजित पवारांवर टीका केली. तुम्ही घरफोडे, तुमच्याकडे स्वतःचे नेते आहेत का? फडणवीसांवर टीका केली. माझ्या वडिलांचे फोटो लावण्यापेक्षा ईडी सीबीआयचे फोटो लावा, असे त्यांनी शिंदे गटाला उद्देशून म्हटले.











