फौजदारही ड्रग्स तस्कर? पुण्यात पोलीस उपनिरीक्षक शेळकेकडून चौकशीत आणखी 2 कोटींचे ड्रग्स जप्त

0

पुणे शहरातील पोलीस दलाची चर्चा सातत्याने सुरु असते. ससून रुग्णालयातून ड्रग्स तस्कर ललित पाटील पोलिसांसमोरच फरार झाला होता. त्या प्रकरणात काही पोलीस कर्मचारी बडतर्फ झाले. हे प्रकरण शांत होत नाही, तोपर्यंत आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा प्रताप समोर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक असलेल्या विकास शेळके याने झटपट श्रीमंत होण्यासाठी ड्रग्स लंपास करण्याचा प्रयत्न केला. मेफेड्रोन नावाचे ड्रग्स त्याच्याकडून जप्त केले गेले. त्याने ४५ कोटी रुपयांचे ड्रग्स परस्पर विकून कोट्यधीश होण्याचे स्वप्न पाहिले होते. हे ड्रग्स विकण्यासाठी नामचीन गुन्हेगाराशी संपर्क केला होता. पण हा प्रकार उघड झाला. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस चौकशीतून आणखी दोन कोटींचे ड्रग्स त्याच्या मोटारीतून जप्त करण्यात आले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

दोन कोटींचे ड्रग्स जप्त

पिंपरी- चिंचवडमधील निगडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदी विकास शेळके कार्यरत होता. प्रकरण उघड झाल्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले आहे. त्याच्याकडील ४४ कोटी ७९ लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यानंतर विकास शेळके याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने आपल्या मोटारीत आणखी ड्रग्स असल्याचे सांगितले. पोलिसांनी मोटारीतील ड्रग्स जप्त केले. दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन ड्रग्स हे होते. त्याची किंमत दोन कोटी रूपये आहे.

शेळकेने झा याला ड्रग्स विकण्यासाठी पाठवले

मेफेड्रोन विकण्यासाठी रावेत परिसरातील एका नामचीन गुन्हेगारास विकास शेळके याने संपर्क केला. त्यासाठी नमामी झा याला त्या गुन्हेगाराकडे पाठवले. परंतु त्या गुन्हेगाराने सांगवी येथील एका पोलीस कर्मचाऱ्याला याबाबत टीप दिली आणि प्रकार उघड झाला.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार