मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री अमित शाह यांची मंगळवारी (५ मार्च) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठका पार पडल्या. सुरुवातीला अमित शाह आणि तिन्ही नेत्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे झालेली बैठक जवळपास अर्धा तास चालली.






सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश जागांवर एकमत झाले आहे. भाजप जवळपास 32 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ जिंकण्याच्या क्षमतेच्या आधारावर जागा मिळतील, ज्यासाठी त्यांना काही जागांची देवाणघेवाण करावी लागेल आणि आवश्यकता भासल्यास कमळ चिन्हावर त्यांचे उमेदवार उभे करावे लागतील. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सह्याद्रीहून निघून गेले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि अमित शहा यांच्यात सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली.











