चांदणी चौक रखडलेल्या उड्डाणपूलाचे सहा वर्षांनी उद्या उद्घाटन; २५ वर्षांचा विचार करून आराखडा

0

चांदणी चौकाच्या उड्डाणपूलाचे भूमिपूजन २०१७ मध्ये झाले होते. दोन- तीन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु आता सहा वर्षांनी म्हणजे उद्या १२ ऑगस्ट रोजी उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. शहराच्या पश्चिमेचे प्रवेशद्वार असलेल्या चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. अनेक जणांना जीव गमावले लागले. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग स्वतंत्र आणि स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ते असे उपलब्ध करून देण्यासाठी उड्डाणपुलाची योजना पुढे आली होती.

उड्डाणपुलाचा आराखडा ‘आयआयटी’ मुंबईकडून तयार करून घेतला आहे. तज्ज्ञ संस्थांकडून तपासून घेतला. पुढच्या २५ वर्षांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. असे भूमिपूजन प्रसंगी गडकरी यांनी सांगितले होते. महापालिकेने नियोजन केलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामाचा खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उचलावा. अशी अपेक्षा महापालिकेने व्यक्त केली होती. त्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजूर दिली होती.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन २०१७ मध्ये झाले. कोरोनापुर्वी म्हणजे नोव्हेंबर २०१९ पर्यंत कामच सुरु झाले नव्हते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने निधी मंजूर केला होता. त्यानंतर, प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. तरी देखील पुलाचे काम सुरू झाले नव्हते. यामध्ये, महापालिकेच्या संथ कारभारामुळे संपूर्ण भूसंपादन झाले नसल्याने उड्डाणपुलाच्या कामाला फटका बसला.

पुलाच्या कामासाठी सुमारे २७ हेक्‍टर जागेचे संपादन करावे लागणार आहे. त्यातील सुमारे १२ हेक्‍टर जागेचे भूसंपादन महापालिकेने केले. सव्वा हेक्‍टर जागा खासगी आहे. उर्वरित जागा सरकारी संस्थांची आहे. या प्रकल्पामुळे ११६ कुटुंबे बाधित झाली. त्यांचे पुनर्वसन केले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

चांदणी चौक, दृष्टिक्षेपात

-कामाचे भूमिपूजन २७ ऑगस्ट २०१७

-नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

-कामाचे अंदाजपत्रक ३९७ कोटी

-१३.९२ भूसंपादन करावे लागले

-सप्टेंबर २०२२ चा खेळ ७१ टक्के काम पूर्ण

-१ऑक्टोबर २०२२ गडकरी यांनी केली हवाई पाहणी

-२ऑक्टोबर २०२२ रोजी पूल पाडला

-यापूर्वी उद्घाटनाच्या तारखा १ मे, एक जुलै, १५ जुलै जाहीर केल्या होत्या.