पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना हे आवाहन तर काँग्रेसवरही मोठी टिका

0
1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरातील सभेसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी हजेरी लावली. मोदींच्या भाषणाला सुरुवात होण्यापूर्वी भिडे हे प्रेक्षकांमध्ये पुढच्या रांगेत बसले. या ठिकाणी बसून त्यांनी मोदींचं संपूर्ण भाषण ऐकलं. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील हजेरी लावली.

हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धर्यशील माने आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची सभा पार पडली. यावेळी मोदींनी नेहमीप्रमाणं मराठीतून भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा आपल्याला सत्तेत बसवण्याचं आवाहन केलं.

दरम्यान, मोदींनी यावेळी आपल्या सरकारनं राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामांची उजळणी केली. यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, राम मंदिराची उभारणी, सीएएची अंमलबजावणी याचा समावेश होता. तसेच काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसनं सनातनविरोधात भूमिका घेतल्याचं सांगितलं, तसेच राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावणं टाळलं याची देखील आठवण करुन दिली.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

संभाजी भिडेंची हजेरी

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी देखील यावेळी मोदींच्या सभेला हजेरी लावली. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह ते सभा मंडपात दाखल झाले. यावेळी त्यांना प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत बसायला जागा देण्यात आली होती. संभाजी भिडेंनी स्वतः मोदींच्या सभेला हजेरी लावणं हे वेगळा संदेश देणारं ठरु शकतं.