मोदींच्या 4दिवसांत पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात 9सभा ! पुण्यात उद्धव ठाकरेही भाजपचा लगेच समाचार घेणार

0
1

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 48 पैकी 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने केला आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प भाजपसह महायुतीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. त्यासाठी जोरदार ताकद लावली जात आहे.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या अधिकाधिक जागा विजयी व्हाव्यात, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकाधिक सभा घेण्याचे नियोजन महायुतीकडून केले जात आहे. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात लोकसभेचे मतदान होत असलेल्या मतदारसंघात मोदींच्या सभांचा झंझावात असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील 14 उमेदवारांच्या प्रचारासाठी चार दिवसांमध्ये नऊ जाहीर सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. सोमवार 29 एप्रिल आणि मंगळवारी 30 एप्रिल या दोन दिवशी पश्चिम महाराष्ट्रात सहा सभा होणार आहेत. त्यामुळे या दोन दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण जोरदार तापणार आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, बीड, धाराशिव, लातूर तसेच नगर जिल्ह्यांत होणार आहे. या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा घेण्यात याव्यात, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. यासाठीचे नियोजन भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून केले जात होते. मोदी यांच्याबद्दल नागरिकांमध्ये मोठा विश्वास आहे. त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना व्हावा, यासाठी मोदी यांची सभा घेण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती.

महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले असून, तिसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरू झाला आहे. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघासाठी मतदान होत आहे. यामध्ये सर्वाधिक मतदारसंघ हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची रणनीती भाजप महायुतीने आखली आहे. सोलापूर आणि माढा येथील दोन्हीही लोकसभा मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. या दोन्हीही जागा भारतीय जनता पक्ष लढवत आहे. याशिवाय कोल्हापूर आणि सातारा येथेही मोदी त्यांच्या जाहीर सभा घेणार आहेत. चार दिवसांत मोदी नऊ सभा घेणार आहेत.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

उद्धव ठाकरे यांची 30 एप्रिलला पुण्यात सभा

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा 30 एप्रिलला पुण्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात 29 एप्रिलला सभा होणार आहे. त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार होती. मात्र, आता ती पुढे ढकलून ३० एप्रिलला होणार आहे. बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ही सभा होणार आहे. वारजे भागात या सभेचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तर बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे निवडणूक लढत आहेत.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे