‘राज्यभरात बॅनर लावताना साहेबांचा फोटो…’, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कार्यकर्त्यांना आदेश

0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी बंड करत भाजप शिवसेना यांच्यासोबत सरकारमध्ये समावेश केला. आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. तसेच, राज्याचा गाडा आता शिंदे-फडणवीस-पवार सरकार चालवणार आहे. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर 8 आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राज्यभरात त्यांचे बॅनर लागले आहेत.

काल झालेल्या राजकीय भूकंपानंतर अजित पवार यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना पोस्टर लावताना शरद पवार यांचा फोटो लावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. आज सकाळी देवगिरी बंगल्यावरती शपथ घेतलेल्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पाठिंबा देणारे आमदार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

तर राज्यभरात कुठेही पोस्टर लावणार असाल तर त्यावर शरद पवार यांचा फोटो लावण्याचे आदेश अजित पवार यांनी दिल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी आपल्या सोबत असल्याचा दावा अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर लागले आहेत. त्यावर शरद पवार यांचा फोटो नसल्यामुळे टीका होताना दिसत आहे. त्यामुळे आता पोस्टर वर शरद पवार यांचा फोटो असावा अशी सूचना अजित पवार यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.