राज्यातील पक्षीय बलाबलही अजित पवारांच्या बंडानंतर बदललं; कोणाचे किती आमदार?

0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी बंड करत भाजपची कास धरली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरच्या फळीत सामील होणारे अजित पवार काल (रविवारी) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. तसेच, राज्याचा गाडा आता शिंदे-फडणवीस-पवार सरकार हाकणार आहे. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर 8 आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.

शपथविधीनंतर अजित पवारांनी दावा करत म्हटलं की, आम्हाला पक्षाचाही पाठींबा आहे. तसेच, पक्षाचं नाव, पक्षचिन्हही आमच्याकडेच आहे, तसेच आम्ही याच नावावर आणि चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केला की, राष्ट्रवादीतील 53 पैकी 40 आमदारांचा राज्य सरकारला पाठींबा आहे. दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील पक्षीय बलाबलही बदललं आहे. आधी एकनाथ शिंदेंचं शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर अजित पवारांचं राष्ट्रवादीतील बंड यामुळे भाजप-शिवसेना (शिंदे गट)- अजित पवार (राष्ट्रवादी गट) यांना पाठींबा असणाऱ्या आमदारांची संख्या आणि शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना पाठींबा असलेल्या आमदारांची संख्या किती ते पाहुयात…

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

महाराष्ट्राच्या विधानसभेतील जागांचं गणित
महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत. यामध्ये कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी 145 आमदारांची गरज आहे. जागांच्या संख्येबद्दल बोलायचं झालं तर भाजपचे 106 आमदार आहेत. तर गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून 40 आमदारांसह ठाकरेंपासून फारकत घेतली होती. त्यांनी भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता शिंदे गटाच्या एकूण 44 आमदारांचा सरकारला पाठिंबा आहे. तसेच, राज्यात राष्ट्रवादीचे 53 आमदार आहेत. आता अजित पवारांसह 40 आमदारांनी सरकारला पाठिंबा दिल्याचा दावा केला जात आहे. यासोबतच इतर 21 आमदारांचाही सरकारला पाठिंबा आहे. त्यात 12 अपक्ष आमदारही आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

विरोधी पक्षांची परिस्थिती काय?
विरोधी पक्षाबाबत बोलायचं झालं तर, महाराष्ट्रात काँग्रेसचे 44 आमदार आहेत. तर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 12 आमदार आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट) 13, समाजवादी पार्टी 2 आमदार, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा एक, स्वाभिमानी पक्षाचा एक आणि पीजेंट्स एंड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचा एक आमदार आहे. यासोबतच एक अपक्ष आमदार विरोधी पक्षात आहे. तर AIMIM चे 2 आमदार तटस्थ आहेत.

राज्य सरकारला कोणाचं समर्थन?
भाजप : 106
शिवसेना (शिंदे गट) : 44
NCP (अजित पवार गट) : 40
इतर : 21

शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या विरोधात
कांग्रेस : 44
शिवसेना (उद्धव गट) : 12
एनसीपी (शरद पवार गट) : 13
अन्य : 8

शपथ घेण्यापूर्वी अजित पवार काय म्हणाले?
पक्षाचे नाव आणि चिन्हही माझ्याकडेच राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. मी उर्वरित आमदारांशीही संपर्क साधला असून आज संध्याकाळपर्यंत अनेक आमदार येथे पोहोचतील. यापुढे कोणतीही निवडणूक मग ती जिल्हा परिषद असो वा अन्य पंचायत निवडणूक, पक्षाच्या (NCP) चिन्हावरच लढू, असं त्यांनी स्पष्टपणं सांगितलं. नागालँडमध्येही राष्ट्रवादीचे 7 आमदार निवडून आले आणि त्यांनी विकासासाठी भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं तुम्हाला आठवत असेल, असंही अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

अजित पवारांसोबत मंत्रीपदाची शपथ कोणी घेतली?
राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. मात्र, आज अजित पवारांव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यात धर्मराव आत्राम, सुनील वलसाडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री राजभवनात उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल देखील राजभवनात उपस्थित होते.