काही दिवसापूर्वी, राजगडाच्या पायथ्याशी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध ठिकाण सदाशिव पेठ येथे एका तुरुणीवर तरुणाने कोयत्याने हल्ला केला पण MPSC तरुणांनी तिला वाचवलं.






सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकी जवळ घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, झालेल्या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही घटना घडली आहे.
थरारक घटना….
एम पी एस सी करणाऱ्या तरुणीवर एम पी एस सी करणाऱ्या तिच्या मित्राने सदाशिव पेठेत कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर ही तरुणी जीव मुठीत धरून धावायला लागली. मात्र तिच्या मागे कोयता घेऊन धावणार्या तरूणाला पाहुन कोणीच मदतीला पुढ आलं नाही.
जखमी अवस्थेत ती मुलगी धावत होती. एवढ्यात लेशपाल जवळगे नावाच्या तरुण त्या मुलीच्या मदतीला धावला. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार एवढ्यात लेशपाल जवळगेने कोयता पकडला आणि हल्लेखोर तरणाला रोखले. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला.त्यानंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलय.











