बंगाली सुपरस्टार रिताभरीचा लंडनमध्ये वर्किंग वाढदिवस ! 

रिताभरीने तिच्या आगामी बंगाली प्रकल्पाच्या सेटवर वर्किंग बर्थडे साजरा केला !

0
3
अश्या तऱ्हेने रिताभरीने साजरा केला वाढदिवस ! 
सुप्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रिताभरी चक्रवर्ती यावर्षी तिने तिचा वाढदिवस एका अनोख्या आणि उत्साही पद्धतीने साजरा केला. रिताभरी सध्या लंडन शहरात तिच्या बहुप्रतीक्षित बंगाली प्रकल्पाच्या सेटवर काम करत असल्याचं समजतंय. यंदा ती तिचा वर्किंग वाढदिवस लंडन मध्ये खास प्रकारे सेलिब्रेट करतेय.
26 जून रोजी जन्मलेल्या रिताभरी चक्रवर्तीने तिच्या अनोख्या प्रतिभा शैली ने  आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. नाव लौकीक मिळवून ती अनेक बंगाली सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटत आहे.
रिताभरी या खास वाढदिवसाविषयी उत्साह व्यक्त करताना म्हणते ” मला सर्वात जास्त जे काम करतेय ते करत असताना माझा वाढदिवस साजरा करू शकले हे मी अत्यंत भाग्यवान समजते. सेटवर असणे आणि अशा प्रतिभावान व्यक्तींसोबत काम करण्याचं भाग्य मला लाभलं म्हणून मी कृतज्ञ आहे “
चाहते या प्रकल्पाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. सेटवर रिताभरी तिचा वाढदिवस साजरा करते आहे हे तिच्या कलेबद्दलचे तिचे अतूट प्रेम दाखवून देत.
अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे