सोनम खान OTT वर पदार्पणासाठी सज्ज ! 

0
2
sonam khan
90 च्या दशकातली सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनम सोनम खान हिने तिच्या अपवादात्मक कामगिरीने अनेकांची मने जिंकली आणि ” बॉलिवुडची सर्वोत्कृष्ट नायिका” ठरली ! ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, गोविंदा, संजय दत्त आणि चंकी पांडे यांसारख्या ख्यातनाम अभिनेत्यां सोबत तिने काम केलं एक नव्हे तर तीन चित्रपटांमध्ये दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या विरोधात तिने अनोखी भूमिका साकारली तसेच प्रोसेनजीत चॅटर्जी आणि चिरंजीवी सारख्या सुपरस्टार अभिनेत्यासोबत तिने काम करून नव्वदीच्या काळात आपल्या अभिनयाने सगळ्यांची मन सोनमने जिंकली.
 आजही लाईम लाईट मध्ये राहून  या जबरदस्त अभिनेत्रीने इतकी वर्षे तिचे आकर्षण कायम ठेवले आहे. ती आता पुन्हा कॅमेऱ्याला सामोरे जाण्यासाठी आणि इंडस्ट्रीत आपल्या कामाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. ओटीटी हे काही मनोरंजनाचा नवीन माध्यम बनल्यामुळे ही अभिनेत्री म्हणते, “प्रत्येक अभिनेता OTT वर एक नायक आहे कारण OTT प्लॅटफॉर्मवर असलेला कंटेंट खूप समृद्ध आहे. मी मिर्झापूर आणि जामतारा यांची खूप मोठी चाहती झाली. मी त्यांना बिनधास्तपणे पाहिलं आहे. मला एखादा ओटीटी शो आला तर मी नक्कीच हो म्हणेन “
सोनम 90 च्या दशकातील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा भाग झाली ज्यात अजूबा, त्रिदेव आणि विश्वात्मा यांचा समावेश आहे. सोनामचे चाहते तिला पुन्हा एकदा रुपेरी  पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत.
अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती