खासदार शिंदेंच्या सभेत शॉर्टसर्किट एक जखमी फक्त ट्विटरवरून काम होत नाही जहरी टीका

0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दिवा येथील एका सभेत भाषणादरम्यान वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळते आहे. यानंतर शिंदे यांनी तात्काळ वीज पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या. सुत्रांच्या माहितीनुसार, खासदार श्रीकांत शिंदे यांचं भाषण सुरू असताना सभेच्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं. त्यानंतर शिंदे यांनी त्वरित वीज पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

“गेल्या निवडणुकीत आपण ज्या लोकांना मतदान केलं त्याचठिकाणी पाच वर्षांनंतर आता विधानसभेची निवडणूक येईल. या पाच वर्षात आपण दिव्यासाठी काय केलं याच उत्तर देखील आपण मागितलं पाहिजे. फक्त ट्विटर वरून टीका करून काम होत नाही. खाली उतरुन याठिकाणी काम करावं लागतं,” अशा शब्दांत खासदार शिंदे यांनी आमदार राजू पाटील यांच नाव न घेता टीका केली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

आमचे नगरसेवक पदाधिकारी याठिकाणी काम करत आहेत आणि मला विश्वास आहे की आपला पदाधिकारी हा आपल्या सेवेत तत्पर आहे. आपण दाखवलेल्या विश्वासला कधीही तडा जाणार नाही, असा शब्द मी देतो असंही यावेळी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले..