औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही, दोषींवर कठोर कारवाई करा ; फडणवीसांची पोलिसांना सूचना

0

तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणा असा आदेश कोल्हापूर पोलिसांना गृहविभागाने दिला आहे. अहमदनगरपाठोपाठ कोल्हापुरातही औरंगजेबाच्या फोटोवरून राडा झाला. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनेनं कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांच्या आवाहनानंतरही आंदोलक रस्त्यावर आहेत. आंदोलन मागे घेण्याचे पोलिस आवाहन करत आहेत. मात्र, हिंदुत्ववादी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन करत दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही. असे सांगत, जनतेला शांतता पाळण्याचं आवाहन फडणवीस यांनी केल आहे. तसेच, कोल्हापूर पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करा अशी सूचनादेखील दिली आहे. कुणी चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. ताक्ताळ परिस्थिती नियंत्रणात आणा. असे निर्देश गृहविभागाने दिले आहेत. यासोबत खबरदारी म्हणून इतर जिल्ह्यांवरही बारीक नजर ठेवा अशी सूचनाही पोलिसांना देण्यात आली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

छत्रपती शिवाजी चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते याच्यामध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. यावेळी जमावाकडून पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी महापालिका चौक, शिवाजी चौक या रोडवर प्रचंड धावपळ झाली.

छत्रपती शिवाजी चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते याच्यामध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. यावेळी जमावाकडून पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी महापालिका चौक, शिवाजी चौक या रोडवर प्रचंड धापवळ झाली.

समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळं कोल्हापूर शहरात दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला, त्यामुळं हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीन कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

औरंगजेबाच्या समर्थनाचा स्टेटस ठेवल्याच्या प्रकरणावरून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर जमावानं सुमारे तीन तासांहून अधिक काळ घोषणाबाजी केली. ‘जय श्रीराम’चा नारा देत या घटनेतील संशयितावर कडक कारवाई करावी, यासाठी आंदोलन केलं. संतप्त जमावातील काही तरुणांनी या परिसरातील दुकाने बंद पाडली.