अ‍ॅपलच्या सीईओची माधुरी दिक्षीतने घेतली भेट, अन् रंगली वडापाव पार्टी

0
1

मुंबई : जगप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक त्यांच्या कंपनीच्या स्टोअर लाँचसाठी मुंबईत आले आहेत. त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान कूक यांनी बॉलिवुड अभिनेत्री माधुरी दिक्षीत सोबत मुंबईचा फेमस वडापावचा आनंद घेतला.

माधुरीने तिच्या ट्विटर अकाउंटवरून या भेटीचा फोटो ट्वीट केला आहे. मुंबईत वडापावपेक्षा उत्तम स्वागत कशाने केलं जाऊ शकतं असं कॅप्शन माधुरीने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये दोघे वडापाव हातात घेऊन मोठ्याने हसताना दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन तन्मय भट्टने माधुरी आणि टीम कुक यांचा फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन दिलं आहे. हे घडत असताना जर कोणी कूक कूक कूक… गात नसेल तर मग कशालाच काही अर्थ नाही असे तन्मय म्हणाला आहे. या ट्वीटवर देखील नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट पाहायला मिळत आहेत.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

आयफोन बनवणाऱ्या अॅपल या मोबाईल कंपनीचे सीईओ टीम कूक हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी रात्री त्यांचं मुंबईत आगमन झालं, कुलाब्यातील हॉटेल ताल पॅलेसमध्ये कूक यांचा मुक्काम असणार आहे. तत्पूर्वी कूक यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची घरी भेट दिली. यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतील असं सांगितलं जात आहे.

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये अॅपलच्या भारतातील पहिल्या स्टोअरचं उद्घाटन होणार आहे. १८ एप्रिलपासून अॅपलचं हे आऊटलेट ग्राहकांसाठी खुलं होणार आहे. त्यानंतर नवी दिल्लीतील साकेत भागात लवकरच अॅपलं दुसरं स्टोअर सुरु होणार आहे. स्वतः अॅपलचे सीईओ टीम कूक यांच्या हस्ते या स्टोअर्सचे उद्घाटनं होणार आहेत. यावेळी कूक पंतप्रधान मोदींची भेट घेऊ शकतात.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ