पुणेकरांसाठी २०२५ भयानकच! माणुसकीला काळिमा या १५ घटना! शहर हादरतच राहिलं आजही अंगावर शहारे

0

पुणे शहर… रोज नवी स्वप्नं पाहणारे लाखो चेहेरे, शांत रस्ते, सुरक्षिततेची भावना, आणि जगभरातून येणाऱ्या तरुणाईची धावपळ. पण २०२५ हे वर्ष या शहरासाठी एखाद्या भयकथेसारखं ठरलं. गुन्हे, गँगवार, रस्त्यावरचे हल्ले, बलात्कार, घरगुती हिंसा आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या १५ घटनांच्या मालिकेने हे शहर जणू हादरतच राहिलं. रात्रीच्या अंधारातच नव्हे, तर दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी, सोसायट्यांमध्ये, रस्त्यावर, अगदी बस आणि पार्किंगमध्येही अपराध्यांनी दहशत माजवली. प्रत्येक घटनेनंतर पुणेकरांच्या अंगावर काटा उभा राहिला आणि प्रशासनापुढे सुरक्षेचे मोठे प्रश्न उभे राहिले. गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण, पोलिसांवरील ताण, नागरिकांमधील असुरक्षितता आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे शहरात घबराट तयार झाली.

पुणे शहरातील २०२५ मधील १५ धक्कादायक घटना –

शुभदा कोडरे हत्याकांड

येरवडा परिसरात ८ जानेवारी २०२५ रोजी घडलेली शुभदा कोडरे हत्याकांड घटना वर्षातील पहिली आणि सर्वात धक्कादायक ठरली. डब्ल्यूएनएस कंपनीतील २८ वर्षीय शुभदावर तिचाच सहकारी कृष्णा कनोजा याने पार्किंग लॉटमध्ये निर्दयपणे १० पेक्षा जास्त वार केले. हा हल्ला इतका क्रूर होता की सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले, पण त्याहून जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे आजूबाजूला उभे असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. पैशाच्या वादातून सुरू झालेला हा संघर्ष थेट हत्येत परिवर्तित झाला आणि उपचारादरम्यान शुभदाचा मृत्यू झाला. आरोपीला तत्काळ अटक झाली, पण या घटनेने कार्यस्थळावरील सुरक्षा आणि सामाजिक उदासीनता यावर मोठा प्रश्नचिन्ह उभा केले.

कोथरूडच्या शास्त्रीनगर भागात २२ वर्षीय गौरव थोरात याचा खून 

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

२४ फेब्रुवारीला कोथरूडच्या शास्त्रीनगर भागात २२ वर्षीय गौरव थोराट याचा जुन्या वैमनस्यातून १० जणांनी बेभान हल्ला करून खून केला. पिस्तूलची गोळी चुकल्यानंतर आरोपींनी कोयते-दगडांनी त्याला ठेचून मारले. ७ जणांना अटक झाली, २ अल्पवयीन ताब्यात घेतले गेले, तर परिसरात गुंडगिरीच्या वाढत्या प्रमाणाची भीती निर्माण झाली.

शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय महिलेवर दोन वेळा बलात्कार

दुसरी थरारक घटना २५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वारगेट डेपोमध्ये उलगडली, जिथे एका रिकाम्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय महिलेवर दोन वेळा बलात्कार करण्यात आला. इतिहासशीत गुंड दत्तात्रय गाडे याने ‘दीदी’ म्हणून विश्वासात घेऊन तिला बसमध्ये नेले आणि निर्घृण अत्याचार केला. पहाटे घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी ७५ तासांची सर्वांत मोठी शोधमोहीम राबवून २८ फेब्रुवारीला शिरूरमध्ये आरोपाला पकडले. या प्रकरणानंतर महिला सुरक्षेच्या प्रश्नाने पुणे हादरले.

कर्मचाऱ्यांनी भरलेली बस जळून खाक

१९ मार्च २०२५ रोजी हिंजवडी आयटी पार्कमध्ये कर्मचाऱ्यांनी भरलेली बस जळून खाक झाली. सुरुवातीला शॉर्टसर्किट म्हटलं गेलं, पण एफएसएल अहवालानंतर समजलं की चालकानेच बेन्झीन टाकून बस पेटवली होती. पगार आणि वादाच्या रागातून त्याने हा प्रकार घडवला आणि यात ४ जणांचा मृत्यू झाला.

आठ वर्षांच्या मुलासमोरच पत्नीचा खून

६ मे रोजी नांदेड सिटीजवळ पतीने आठ वर्षांच्या मुलासमोरच पत्नीचा खून केला आणि मृतदेह बाइकवरून घेऊन निघाला. पोलिसांनी चौकशी केली असता मुलाने सांगितलेल्या सत्यामुळे आरोपीचा भांडाफोड झाला.

१८ वर्षीय कोमल जाधवचा खून

१२ मे रोजी वाल्हेकरवाडीमध्ये १८ वर्षीय कोमल जाधव हिचा दोन जणांनी रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने खून केला. पोलिसांनी २४ तासांत आरोपींना पकडलं आणि चौकशीत समोर आलं की मुख्य आरोपी तिचाच शेजारी होता. या माहितीने परिसर हादरला.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

वैष्णवी हगवणे प्रकरण

१६ मे रोजी मुळशी तालुक्यात वैष्णवी हगवणे प्रकरण उजेडात आले. तिच्या मृत्यूनंतर सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप झाला आणि या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली.

आई आणि दोन चिमुकल्यांचा निर्घृण खून

२५ मे रोजी रांजणगावमध्ये आई आणि दोन चिमुकल्यांचा निर्घृण खून झाला. डोक्यात वार करून हत्या करण्यात आली आणि मृतदेह पेटवण्याचा प्रयत्न झाला. पावसामुळे देह अर्धवट जळाल्याने हा भयावह प्रकार उघडकीस आला.

तळजाई टेकडीवर हल्ला

जुलै १५ रोजी तळजाई टेकडीवर पोलिस भरतीसाठी सराव करणाऱ्या मुलांवर १०-१२ जणांच्या गटाने हल्ला केला. कुस्तीपटूंच्या या टोळीने महिलांसह उमेदवारांना शिवीगाळ व मारहाण केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ८ आरोपींवर गुन्हा दाखल झाला आणि भरती प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर प्रश्न उभे राहिले.

दुकानदारावर खंडणीसाठी हल्ला

जुलै १७ ला भुंकम परिसरात दुकानदारावर खंडणीसाठी हल्ला झाला. रात्री १० वाजता दुकान बंद करताना टोळीने पैसे मागितले व नकार दिल्यावर त्याच्यावर लाठ्या-दगडांनी हल्ला केला. ४ आरोपी अटकेत, पण इतर फरार असून बाजारात दहशतीचं वातावरण पसरलं.

आयुष कोमकर हत्याकांड

सप्टेंबर ९ रोजी आंदेकर गँगने नाना पेठमध्ये १९ वर्षीय अभियंता आयुष कोमकरचा गोळ्या घालून खून केला. हा त्यांच्या वांरज खून प्रकरणातील सूड होता. १५ जणांना अटक झाली आणि MCOCA लावण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या हत्येने गँगवारची भीती वाढवली.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

मयंक खऱ्हाडेची भरदिवसा हत्या

४ नोव्हेंबर २०२५ रोजी पुण्यातील बाजीराव रस्त्यावर दुपारी सुमारे ३ वाजता घडलेली घटना शहराला हादरवून गेली. मयंक खऱ्हाडे हा १७ वर्षीय तरुण भरदिवसा तीन अल्पवयीन आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून ठार मारला. पूर्वीच्या भांडणातून निर्माण झालेल्या वैमनस्यातून हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली, तर यात टोळीयुद्धाची किंवा इंस्टाग्रामवरील वादाची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली. या धक्कादायक खुनामुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली होती.

नवले ब्रिजवर अपघात

नवले ब्रिजवर मे २०२५ मध्ये पुन्हा एकदा ब्रेक फेल ट्रकने बाईकला धडक दिली व एकजण ठार झाला. हा ब्रिज २०२० पासून ६३ अपघात आणि ४५ मृत्यूंसह ब्लॅक स्पॉट बनला आहे. यानंतर १३ नोव्हेंबर रोजी पुन्हा एक अपघात झाला, ज्यात कंटेनर-कारला आग लागून ८ जण जळून मृत्यूमुखी पडले.

पत्नीचा गळा आवळून खून केला आणि गॅरेजमध्ये मृतदेह जाळला 

७ नोव्हेंबर रोजी वारजे माळवाडीत अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि गॅरेजमध्ये मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. राख नदीत टाकून बेपत्ता तक्रार दाखल केली होती, पण पोलिस तपासात सत्य बाहेर आले.

दिवसाढवळ्या वडगाव बुद्रुकमध्ये खून

नोव्हेंबर १८ रोजी वडगाव बुद्रुकच्या कृष्णकुंज सोसायटीमध्ये २३ वर्षीय तौकीर शेख याचा पार्किंगमध्ये कोयता, कुदळ आणि दगडांनी हल्ला करून खून करण्यात आला. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकरणाने नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण केली.