शांतता रॅली अगोदर खासदार चव्हाण, भुमरे अन् जरांगेंची बंद दाराआड चर्चा; शिष्टमंडळ की रणनिती साशंकता वाढली

0
15

मराठा समाजाला सगेसोयऱ्यांबाबतनिर्णय घेण्यास आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यापूर्वीच जरांगेंनी उद्या शनिवारपासून राज्यभर शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. त्यापूर्वीच सरकारच्या वतीने खासदार अशोक चव्हाण आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगेंची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली आहे.

मनोज जरांगे मराठवाड्यातून शांतता रैली सुरू करणार आहेत. ही रॅली राज्यभर पाच टप्प्यात होणार आहे. त्यापूर्वीच खासदार चव्हाण आणि भुमरे यांनी जरांगेंची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट झाल नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सावध भूमिका घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

दरम्यान, जरांगे हे सगे सोयरेंच्या अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम आहेत. त्याला ओबीसी नेत्यांचाही तीव्र विरोध आहे. परिणामी सरकारपुढे राज्यातील स्थितीबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. या भेटीत राज्यातील स्थितीवरही चव्हाण, भुमरे आणि जरांगे यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामगे मराठा समाजाची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आता काही महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यासाठी सरकार कोणतीही रिस्क घेणार नाही. या पार्श्वभूमीवर ८ जुलै रोजी शिंदे समिती हैदराबाद दौऱ्यावर जाणार आहे. 4 दिवसीय दौऱ्यात ही समिती जरांगेंच्या हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणीच्या मागणीबाबत पुरावे गोळा करणार आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

सगेसोयऱ्यांच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक विचार करत असून जरांगेंनी चुकीचा समज डोक्यातून काढून टाकावा, असे मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde यांनी शब्द दिल्याचे मंत्री शंभुराज देसाईंनी सांगितले होते. मात्र सग्यासोयऱ्यांची मागणी पूर्ण केली नाही तर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे. 13 जुलैपर्यंत सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तर राज्यातील 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे याचा विचार करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.