आपल्या देशात राजकीय नेते फार कमी लोकांचा आदर्श असतात. त्यामागे कारणं सुद्धा तशीच आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार एक असं नाव आहे, ज्यांच्याबद्दल तरुणाईला आजही कुतूहल आहे. काही तरुण मंडळींसाठी ते आदर्श आहेत. 12 डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस. आज त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षात पदार्पण केलं. शरद पवारांना आपला आदर्श मानावा असे अनेक गुण त्यांच्यामध्ये आहेत. आजची तरुण मंडळी छोट्याशा पराभवानंतर डिप्रेशनमध्ये जाते, निराश होते. आयुष्यासमोर हार पत्करतात. त्यांनी शरद पवारांचं उदहारण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. इतक्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत शरद पवार सार्वजनिक मंचावर चिडलेत किंवा मर्यादा सोडून कधी काही बोललेत असं झालं नाही.






शरद पवारांनीआपल्या कर्तुत्वाने आणि वर्तनाने इतर राजकीय नेत्यांसमोर एक चांगलं उदहारण ठेवलं. भले शरद पवारांचं फोडफोडीचं राजकारण आदर्श कसं ठरु शकतं, असा मुद्दा काही लोक उपस्थित करतील. पण राजकारणात सत्ता मिळवणं हे कुठल्याही पक्षाचं किंवा नेत्याचं उद्दिष्टय असतं. त्यानुसार तडजोडीच, फोडाफोडीच राजकारण केलं जातं. शरद पवारांचा एक खास गुण म्हणजे त्यांची न हरण्याची आणि न थकण्याची वृत्ती. शरद पवार कधी हार मानत नाही, दोन वर्षांपूर्वीच एकदम ताजं उदहारण आहे. शरद पवार यांना त्यांच्या घरातूनच धक्का बसला. पुतणे अजित पवार यांनी त्यांनी बनवलेला पक्ष फोडला. आमदाराचं नाही, तर पक्षासह निवडणूक चिन्ह देखील मिळवलं.
दर्शन घेतलं आणि कामाला लागले
पण त्यानंतर पवार तणतण करत बसले नाहीत, माझा पक्ष चोरला म्हणून. ते सरळ दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले.यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचा आदर्श. शरद पवारांना घडवण्याचं श्रेय हे यशवंतराव चव्हाणांना जातं. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवारांनी कराडच्या प्रितीसंगमावर जाऊन यशवंतरावांचं दर्शन घेतलं आणि कामाला लागले. त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिजून काढला ते ही वयाच्या 83-84 व्या वर्षी. हार मानली नाही.
तुम जिओ हजारो साल
लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी खासदार निवडून आले. पण विधानसभेला अपयश आलं. पण म्हणून हार मानली नाही. ते आजही लोकांमध्ये जातात, फिरतात. हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्यात इतकी सकारात्मक ऊर्जा आहे की, त्यांनी कॅन्सरसारख्या रोगाला हरवलं. दुसऱ्याबाजूला आपला पक्ष चोरला म्हणून ओरड करणारे नेते दिसतात. शरद पवार यांच्याकडून शिकण्यासारखा आजच्या तरुणाईसाठी बऱ्याच गोष्टी आहेत. हॅप्पी बर्थ डे शरद पवार, तुम जिओ हजारो साल.
महाराष्ट्रातच नाहीतर दिल्लीतही त्यांनी मोठी पदं भुषवली. लोकसभा निवडणुकीत भर पावसात त्यांनी सभा घेतली आणि वातावरण पालटले. त्यांचे विरोधकही त्यांची अभ्यासवृत्ती आणि दुरदृष्टीचे कायम कौतुक करतात. पण त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की जेव्हा डॉक्टर्सनी त्यांना आता तुम्ही महत्त्वाची कामं पूर्ण करुन घ्या. तुमच्याकडे केवळ 6 महिन्यांचा कालावधी आहे. त्यावर शरद पवार यांचं असं उत्तर होतं…
2004 मध्ये कर्करोग झाल्याचं निदान
एका कार्यक्रमात शरद पवार यांनी 2004 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी कर्करोग, कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. ते उपचारासाठी न्यूयॉर्क येथे गेले. तिथे भारतातील काही निष्णात डॉक्टर्सकडे जाण्यास सांगितले. कृषीमंत्री असताना त्यांना 36 वेळा रेडिएशनचा उपचार घ्यायचा होता. ही बाब अत्यंत वेदनादायी होती. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शरद पवार हे मंत्रालयात काम करायचे. त्यानंतर 2.30 वाजता ते ॲपोलो रुग्णालयात केमोथेरपी घेत होते.
केमोथेरपीमुळे अत्यंत वेदना होत होत्या. त्यांना घरी जाऊन झोपावे लागत होते. त्याचदरम्यान एका डॉक्टराने त्यांना आता सर्व महत्त्वाची कामं लागलीच पूर्ण करून घ्या. तुमच्याकडं केवळ 6 महिन्यांचा कालावधी असल्याचे सांगितले. त्यावर पवार यांनी डॉक्टरला मी या आजाराची चिंता करत नाही. तुम्ही पण कोणतीही काळजी, चिंता करू नका असे उत्तर दिले. पवार यांनी कॅन्सरपासून वाचायचं असेल तर तंबाखू खाऊ नका असा सल्ला दिला आहे.
पत्नीसमोर ठेवली होती ती अट
शरद पवार यांनी एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला होता. त्यानुसार, लग्नापूर्वी त्यांनी पत्नी प्रतिभा पवार यांना एकच मुलं होऊ देण्याची अट घातली होती. ते म्हणाले की आपलं एकच मुलं असावं. मग ती मुलगी असो वा मुलगा. त्यानंतर 30 जून 1969 रोजी पुणे येथे सुप्रिया यांचा जन्म झाला. त्या काळात असा निर्णय घेणं हे कठीण होतं. पण पवारांनी हा निर्णय घेतला होता.
शरद पवार यांची राजकीय कारकीर्द
शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर, 1940 रोजी झाला होता. पवार यांनी त्यांचा राजकीय प्रवास 1967 मध्ये काँग्रेससोबत सुरू केला होता. 1984 मध्ये बारामतीमधून त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. तर 20 मे, 1999 रोजी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत त्यांनी 25 मे 1999 रोजी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला होता.












