इंदू मिल डॉ. बाबासाहेब स्मारकाविषयी मोठी बातमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट तारीख सांगितली

0

डॉ. बाबासाहेब आंबडेकर महापरिर्निवाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला. कालपासून अनुयायांची मोठी गर्दी झाली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी महामानवाला अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी महत्त्वाची माहिती दिली. हे स्मारक पुढील 6 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

इंदू मिलचे स्मारक एका वर्षात

यावेळी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक हे पुढील महापरिनिर्वाण दिनापर्यंत पूर्ण करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मुंबईतील दादर येथील इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं जागतिक दर्जाचं भव्य स्मारक उभारलं जात आहे. यामध्ये 450 फूट उंचीचा त्यांचा पुतळा असेल. हे स्मारक डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 ऑक्टोबर 2015 रोजी केलं होतं. स्मारकाचं काम सुरू असून डिसेंबर 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

अमेरिकेच्या जे लक्षात आले नाही…

बाबासाहेबांच्या कार्यांना उजाळा देताना मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. अमेरिकेच्या न्यूजर्सीचे गव्हर्नर यांनी नुकतीच मुंबईला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी एक माहिती दिली. त्यानुसार, न्यूयॉर्कसह इतर शहरात वीजेची कमतरता भासते. कारण त्यांच्याकडे स्टेट ग्रीड आहे. नॅशनल ग्रीड नाही. त्यावेळी मला हे लक्षात आलं की बाबासाहेब किती द्रष्टे होते. वीज मंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी संपूर्ण भारतात एक राष्ट्रीय ग्रीड तयार करायची असा निर्णय घेतला. भारतातील कुठल्याही भागातून दुसऱ्या कुठल्याही भागात वीज वाहून नेता आली पाहिजे. त्यांच्या या द्रष्टेपणामुळे भारतातील कुठल्याही कानाकोपऱ्यातून वीज वाहून आणता येते. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राला जे लक्षात आलं नाही. ते भाररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लक्षात घेऊन भारताला स्वयंपूर्ततेकडे नेण्याचा द्रष्टपणा दिसून येतो असे मुख्यमंत्री म्हणाले.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!