नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता अजित पवारांनी निवडणूक आयोगात याचिका दाखल केली असून ही याचिका आयोगाला प्राप्त झाली आहे. या याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाची निशाणी घड्याळ या दोन्हींवर दावा सांगण्यात आला आहे.






एएनआयच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीवर आणि पक्ष चिन्हावर दावा करणारी अजित पवारांची याचिका निवडणूक आयोगाकडं दाखल झाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दाखल केलेली कॅव्हेट देखील निवडणूक आयोगाला प्राप्त झाली आहे. यामध्ये ९ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या दोन भिन्न ठिकाणी बैठका पार पडल्या. यामध्ये एमईटी इन्स्टिट्युटमध्ये अजितदादांच्या गटाची बैठक झाली तर वायबी सेंटरमध्ये शरद पवारांनी बैठक बोलावली होती.











