राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला चांगलेच सुनावले आहे. अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर ८ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर देखील दावा केला आहे. दरम्यान पक्ष आणि चिन्हावरील दाव्यावरुन शरद पवार यांनी अजित पवार गटाला सुनावलं आहे. राज्यकर्ते हव तसं बोलत आहेत. पक्ष आणि चिन्हावर दावा सांगत आहेत. चिन्ह जाऊन देणार नाही. सामान्य माणसाच्या अंतकर्णात पक्षाची भूमिका आहे तोपर्यंत चिंता करू नका, असे शरद पवार म्हणाले.






माझ्या राजकीय जीवनात अनेक निवडणूक लढल्या चिन्ह बदलली. पहिली निवडणुकीत चिन्ह बैल होते. मग काँग्रेस फुटली. त्यानंतर गाय,वासरू, चरखा असे चिन्ह होते. मी त्यानंतर मी घड्याळ घेतले,असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
(अजित पवार गट) ते माझे फोटो लावतात. कारण त्यांना माहित आहे. त्यांचे नाणं चालणार नाही. फुटीर गटाने पक्ष ताब्यात घेणे हे लोकाशाहीत योग्य नाही. मी काँग्रेस सोडली तेव्हा काँग्रेसची प्रॉपर्टी सोडून दिली, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.











