स्थानिकमुळे पुणे जिल्ह्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष अधिक तीव्र? ‘अजित पवारांची येथे सत्ता असली तरी…”; बालेकिल्ल्यात चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान

0

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्ष एकमेकांच्या समोर उभे राहिले आहेत. पुण्यातील भोर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रमुख लढत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सध्या भोर मध्ये जोरदार वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. त्यातच आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी थेट अजित पवार यांना टार्गेट केल्यामुळे पुणे जिल्ह्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांचा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.

भोर नगर परिषदेसाठी चंद्रकांत पाटील यांची एक जाहीर सभा पार पडली या सभेमध्ये ‘भोर इथे अजित पवारांची सत्ता असली तरी राज्याच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत भोरच्या जनतेने ठरवायचंय अजित पवार यांच्या बरोबर राहायचं? का राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जायचे?’ असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. भोर नगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ वाघजाई मंदिरात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे.

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!

दरम्यान, भोर तालुक्यातील रोजगाराच्या दृष्टीने औद्योगिक वसाहतीचा प्रश्न महत्वाचा असून भोरच्या औद्योगिक वसाहतसाठी करण्यासाठी प्रयत्न करू आणि येथील महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बिहार विधानसभा निवडणुकीत NDA ला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला मिळालेल्या जनादेशामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन झाले. देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोदीजींच्या नेतृत्वावर आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. देश क्रमांक एक बनावा, भारताचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मोदीजी सतत प्रयत्नशील आहेत. नागरिकांसाठी अनेक लोकोपयोगी योजना राबवून त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवला आहे. या सर्व योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी भोर नगर परिषदेतही भाजपाचे सरकार असणे अत्यावश्यक आहे, हे यावेळी त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार

तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले तरी आम्ही माजलो नाही, दुसऱ्यांचा पक्ष संपावून टाका म्हणून ए आण रे त्याला उचलून असं काही केलेलं नाही. त्यांना वाटतय भविष्य बीजेपीच आहे, म्हणून ते येत आहेत. संग्राम थोपटे भाजपमध्ये आल्या आल्या त्यांच्या राजगड साखरं कारखान्याला मदत झाली. ती काँग्रेसमध्ये झाली नसती. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंग वरही भाष्य केलं आहे.