भाजपमध्ये इनकमिंग वाढण्याची शक्यता; स्ट्राँग उमेदवार आला तर 100% भाजपमध्ये घेणार, मुख्यमंत्र्यांकडून निवडणुकीची दिशा स्पष्ट

0

भाजपचा पुणे महापालिकेसाठी मेगा प्लॅन तयार असून निवडणूक जिंकण्याचे सूत्र खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. इतर कोणत्याही पक्षातून एखादा स्ट्राँग उमेदवार किंवा कार्यकर्ता पक्षात आला तर त्याला घेणार असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीची दिशा स्पष्ट केली. त्यामुळे महापालिकेच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग वाढण्याची शक्यता आहे.

महायुतीकडून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. शनिवारी, पुण्यात पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या शहरातल्या भाजप प्रमुखांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. याच बैठकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठीचा मोठा प्लॅन देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

पुण्यात भाजपमध्ये कोणताही स्ट्राँग कार्यकर्ता आला तर त्याला भाजपात घेण्याची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं. आता हे स्ट्राँग कार्यकर्ते नेमके कोणते आहेत याची सध्या पुणे शहरात आणि पुण्यातील भाजपच्या वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पुण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन

सध्या भाजपामध्ये महाराष्ट्रभरात सगळ्याच ठिकाणी मोठी इन्कमिंग सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहितीतील सगळ्याच पक्षाकडून स्ट्राँग कार्यकर्ते आणि स्ट्राँग नेत्यांची चाचणी सुरू आहे. त्यातच पुण्यासाठीचा मेगा प्लॅन तयार करण्याच्या तयारीत भाजप दिसताहेत.

भाजपने पुण्यात 120 जागांवर दावा केला आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना हे तिघेही एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे. महायुती एकत्र लढेल की नाही ते माहिती नाही, मात्र भाजपकडून स्ट्राँग कार्यकर्त्यांना थेट एन्ट्री दिली जाणार हे स्पष्ट झालं आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

भाजपमध्ये कुठलाही स्ट्राँग कार्यकर्ता जर आला तर त्याला घेण्याचीच आमची भूमिका आहे. साधारणपणे भाजपमध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत ते लोकांना सामावून घेतात. त्यामुळे भाजप मोठा झालेला आहे. एखाद्या ठिकाणी काही नाराजी जरी असली तर आम्ही समजावतो आणि तेदेखील समजतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमधील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुण्यात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.