अंबानींना पाहिजे 25,500,00,00,000 रुपये कर्ज; आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीला पैशांची गरज का आहे?

0

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी मोठे कर्ज घेणार आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना 3 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची गरज आहे. या कर्जासाठी ते अनेक बँकांशी बोलत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी या कर्जाची गरज आहे. म्हणजेच कर्ज कमी करण्यासाठी रिलायन्स मोठे कर्ज घेण्याची तयारी करत आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी 2025 मध्ये त्यांच्या कंपनीचे कर्ज कमी करण्याचा विचार करत आहेत. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी नवीन कर्ज घेण्याची योजना आखली आहे. खरं तर, अनेक कर्जांची परतफेड करण्याची अंतिम मुदत 2025 मध्ये येत आहे. मुकेश अंबानी यांना पुढच्या वर्षी ते कर्ज फेडायचे आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

या कर्जाची परतफेड करण्यासाठी, कंपनीला 3 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 25,500 कोटी रुपयांची गरज आहे. यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजची अर्धा डझनभर बँकांशी चर्चा सुरू आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजवर आधीच 2.9 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. यापूर्वी 2023 मध्येही कंपनीने 8 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले होते.

रिलायन्सच्या शेअर्ससाठी गेले सहा महिने कठीण गेले आहेत. रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. कंपनीचे तिमाही निकाल आणि मार्केट कॅप यांचा परिणाम शेअर्सवर दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.

मात्र, कंपनीची स्थिती अतिशय मजबूत आहे. मूडीज रेटिंगने रिलायन्सचे क्रेडिट रेटिंग BAA2 वर कायम ठेवले आहे. कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत आहे. कंपनी आपले कर्ज फेडण्यास पूर्णपणे सक्षम आहे. असे मूडीजचे मत आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता