नवरात्रीचा उपवास कधी सोडावा? नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या.

0

आश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उपवास केला जातो. या वर्षी तृतीया दोन दिवस असल्यामुळे नवरात्र १० दिवसांची आहे. या काळात देवी दुर्गा व तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि उपवास धरला जातो. याच वेळी घटस्थापनादेखील केली जाते. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात शारदीय नवरात्र असेल. या नवरात्रात उपवास सोडण्याची (पारणाची) योग्य वेळ कोणती याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. हिंदू धर्मात उपवास सोडणे आवश्यक मानले जाते आणि तसे केल्यानंतरच तुमचा उपवास पूर्ण मानला जातो. शारदीय नवरात्रीत तुम्ही तुमचा उपवास कधी सोडू शकता ते जाणून घेऊया…

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

शारदीय नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा? 

“अथ नवरात्रपारणनिर्णयः। सा च दशम्यां कार्या॥”

याचा अर्थ असा की, नवरात्राचा उपवास नवमी संपल्यानंतर आणि दशमी सुरू झाल्यावर सोडावा. म्हणजेच नवव्या दिवसाच्या समाप्तीनंतर दहाव्या दिवशी नवरात्रीचा उपवास सोडणे सर्वोत्तम मानले जाते. म्हणून नवव्या दिवसाच्या समाप्तीनंतरच उपवास सोडावा. ही परंपरा ‘निर्णयसिंधु’सारख्या धर्मग्रंथांमध्ये सांगितली आहे. उपवास पूर्ण मानण्यासाठी नवमीपर्यंत उपवास करणं गरजेचं आहे.

दशमी तिथीला नवरात्रीचा उपवास सोडणे

दशमी तिथीला नवरात्रीचा उपवास सोडणं हे सर्वांत शुभ मानलं जातं. म्हणून तुम्ही २ ऑक्टोबर रोजी सकाळी ६:१५ नंतर कधीही उपवास सोडू शकता.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

शारदीय नवरात्री अष्टमी उपवासाची वेळ

जर तुम्हाला अष्टमी तिथीला मुलींची पूजा केल्यानंतर उपवास सोडायचा असेल, तर आज अष्टमी तिथीच्या संध्याकाळी ६:०६ पर्यंत असणार आहे. त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता.

महानवमी २०२५ उपवास वेळ

जर तुम्हाला महानवमीचा उपवास सोडायचा असेल, तर नवमी तिथीच्या ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:०६ वाजता सुरू होईल आणि १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता.

नवरात्रीचा उपवास कसा सोडायचा?

ज्योतिषी सलोनी चौधरी यांच्या मते, जर तुम्ही अष्टमी, नवमी किंवा दशमीला उपवास सोडत असाल, तर त्या दिवशी देवी दुर्गा आणि तिच्या रूपांची नीट पूजा करून, नकळत झालेल्या चुकांसाठी माफी मागायची आणि त्यानंतर भात खाऊन उपवास सोडावा. मग तुम्ही प्रसादातली खीर, हलवा, पुरी वगैरे खाऊ शकता. पण लक्षात ठेवा की, उपवास लसूण-कांदा खाऊन सोडू नका. उपवास फक्त देवीमातेला अर्पण केलेल्या प्रसादानेच सोडावा.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा