शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत ‘ओला दुष्काळ’ जाहीर नाहीच परंतु सर्व सवलती लागू करणार: देवेंद्र फडणवीस

0

महाराष्ट्रात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने राज्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. मराठवाड्यातील शेती पूर्णपणे वाहून गेली आहे. त्यामुळे विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र शासन दरबारी ओला दुष्काळ अशी कोणतीही व्याख्या नाही. तरीदेखील दुष्काळात ज्या सवलती दिल्या जातात, त्या सर्व सवलती शेतकऱ्यांना देण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अतिवृष्टीसंदर्भात आढावा घेण्यात आला असून, सुमारे ६० लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊनही मदत केली जात आहे. शेतकऱ्यांना ज्या कर्जासाठी नोटिसा दिल्या आहेत, त्या सर्व बँकांना थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुठेही वसुली करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्राकडून नक्कीच निधी मिळेल, पण तोपर्यंत राज्य सरकार मदत देणार आहे. आतापर्यंत ८ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पुढील २ ते ३ महिन्यांत कोणताही त्रास होऊ दिला जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले. मात्र शासन दरबारी ओला दुष्काळ अशी कोणतीही व्याख्या नाही. तरीदेखील दुष्काळात ज्या सवलती दिल्या जातात, त्या सर्व सवलती शेतकऱ्यांना देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार

मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अतिवृष्टीसंदर्भात आढावा घेण्यात आला असून, सुमारे ६० लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

फडणवीस म्हणाले, एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊनही मदत केली जात आहे. शेतकऱ्यांना ज्या कर्जासाठी नोटिसा दिल्या आहेत, त्या सर्व बँकांना थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुठेही वसुली करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्राकडून नक्कीच निधी मिळेल, पण तोपर्यंत राज्य सरकार मदत देणार आहे. आतापर्यंत ८ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पुढील २ ते ३ महिन्यांत कोणताही त्रास होऊ दिला जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

ई-केवायसीची अट देखील शिथिल

गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात आम्ही आढावा घेतला. जवळपास ६० लाख हेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी २ हजार २१५ कोटी रुपये राज्य सरकारने वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. ई-केवायसीची अट देखील शिथिल करण्यात आली आहे.

पुढील आठवड्यात घोषणा करू

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत करता येणार आहे. जमीन खरडून जाणे, विहिरी, घरांसंदर्भातील मदत देण्यात येईल. सर्व नुकसानीच्या संदर्भात आम्ही पुढील आठवड्यात घोषणा करू.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना मदत

दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सातत्याने ओल्या दुष्काळाची मागणी होत असते, पण शासन दरबारी अशी कोणतीही संकल्पना नाही. आजवर कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. मात्र आम्ही निर्णय घेतला आहे की ज्या वेळी दुष्काळ पडतो आणि ज्या सवलती दिल्या जातात, त्या सर्व सवलती शेतकऱ्यांना दिल्या जातील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यात सप्टेंबर महिन्यात कोसळलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, घरं कोसळली, जनावरं दगावली तर कित्येकजण आजही पुरामध्ये आहेत. अशा बाधित शेतकऱ्यांना सरकार मदत जाहीर करणार आहे.