श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज प्रकटदिन सोहळा २०२४; याविधीनंतर सर्व दर्शन आणि मठ परिसर अर्धा दिवस बंद

0
2

श्री सद्गुरू शंकर महाराज यांचा प्रकट दिन सोहळा दि:०६ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होत आहे .या कालावधीमध्ये २४ तास श्रींच्या समाधीचे दर्शन भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. दररोज प्रमाणेच दिवसभर खिचडी प्रसादाचा वाटप होईल. सोहळा कालावधीत सायंकाळी ०६ ते रात्री १० महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. उत्सव कालावधीत नित्य समाधी आरती आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल. त्यामध्ये प्रामुख्याने आळंदीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी श्री निरंजननाथ, सज्जनगडचे अधिकारी स्वामी व समर्थ घराण्यातील वंशज स.भ.भूषण स्वामी महाराज, सज्जनगड, परमपूज्य गुळवणी महाराज यांच्या परंपरेतील वासुदेव निवास या आश्रमाचे प्रमुख विश्वस्त परमपूज्य शरद भाऊ जोशी, तसेच समर्थ संप्रदायातील मोहन बुवा रामदासी खातगाव आदींचा सहभाग राहील.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

शनिवार दि :०९ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ०२:३० वाजता श्रींच्या समाधीची महापूजा व आरती संपन्न होऊन भाविकांचे सर्वदर्शन सुरू होईल. तसेच मासीक दुर्गाष्टमीचे रक्तदान शिबिर , पालखी सोहळा हे प्रथेनूसार संपन्न होतील. रविवार दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारच्या आरतीनंतर श्रींची प्रक्षाळ पूजा आणि शांतीपाठ होईल. यानंतर सर्व दर्शन आणि मठ व परिसर अर्धा दिवस बंद राहील. पुन्हा दिनांक ११ नोव्हेंबर पासून सर्व दर्शन सकाळी ६ वाजता सुरू होईल.
सर्व सेवेकरी व भक्तांनी याची नोंद घेऊन व्यवस्थापनास नेहमीप्रमाणे साहाय्य करावे अशी विनंती श्री सतीश कोकाटे (अध्यक्ष), श्री सुरेंद्र वाईकर (सचिव), डॉ. पी. डी. पाटील, डॉ. मिहीर कुलकर्णी, श्री राजाभाऊ सुर्यवंशी, श्री निलेश मालपाणी, श्री प्रताप भोसले यांनी केली आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?