राज्य सरकारकडून 2 दिवसांत 269 ‘जीआर’चा धडाका!मंत्रीमंडळ बैठक होणारं;लोकसभा ‘या’ तारखेला घोषणा?

0

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे. 2019 साली लोकसभा निवडणुकीची घोषणा 10 मार्चला करण्यात आली होती. त्यामुळे या वेळेस निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा कधी केली जाणार ? याकडे इच्छुक मंडळींचे लक्ष लागले आहे. येत्या आठवड्यात कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारच्या पातळीवरील कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी आटपण्याची राज्य सरकारला घाई झाल्याचे पहावयास मिळत आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी 97 कोटी मतदार पात्र ठरले आहेत. यामध्ये 6 टक्क्यांनी नव्या मतदारांची वाढ झाली आहे. तसेच सुमारे 2 कोटी नव मतदारांचाही यामध्ये समावेश आहे, अशी माहिती नुकतीच निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यामुळे आता येत्या काळात लवकरच निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

निवडणूक आयोगाची टीम पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये पुढच्या आठवड्यात भेट देणार आहे. त्यासोबतच जम्मू आणि काश्मीरला देखील 13 मार्च रोजी भेट देणार आहे. त्याचबरोबर 13 मार्चपर्यंत सर्व राज्यांच्या निवडणूक तयारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 13 मार्चनंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोग 14 मार्चनंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे 14 मार्चनंतर कुठल्याही क्षणी निवडणूक आयोग पत्रकारपरिषद घेऊन लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकते.

येत्या आठवड्यात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका पाहायला मिळत आहे. कारण दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे आटपण्याची राज्य सरकारला घाई पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयात पदस्थापना, जल प्रकल्प, कोकणातील कामे, निधींची पूर्तता अशा शासन निर्णयाचा समावेश आहे. आचारसंहितेपूर्वी शासन निर्णय जारी करून कामे आटपण्याची राज्य सरकारला घाई असल्याचे पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते, आणि त्यामुळेच राज्य सरकारने तब्बल 269 शासन निर्णय जारी केले आहेत. 7 मार्च रोजी 173 शासन निर्णय, तर सहा मार्चला 96 शासन निर्णय जारी करण्यात आले असल्याचे समजते.

दोन दिवस राज्य मंत्रीमंडळाची बैठक

राज्य सरकारकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावाली आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये निवडणुकीच्या आधी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णयाचा धडाका

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर नवीन विकास कामांची घोषणा करता येत नाही. त्यामुळे राज्य सरकराने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णयाचा धडाका लावला आहे. निवडणुकीच्या आधी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न महायुती सरकारचा असणार आहे, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.