प्रभाग:10 मध्ये 3 दशकांच्या निष्ठित कार्यकर्त्याची घटबांधणी; नव्या समीकरणामुळे चर्चा सुरू

0

भारतीय जनता पक्षाची तीन दशकांची वाटचाल…. कल्पक विचार संघनिष्ठ विचार सरणी अशी सर्वव्यापी गुणधर्म असलेल्या, श्री. गोरख रावसाहेब दगडे यांनी प्रभाग 10 बावधन भुसारी कॉलनी या नव्या रचनेच्या अनुषंगाने नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर केलेली ‘संकल्पी घटबांधणी’ नवा चर्चेचा विषय बनली आहे. त्यातच घटस्थापनेला स्थानिक आमदार शंकर मांडेकर, विद्यमान आमदारांनी या संकल्पी घट्ट बांधणीला उपस्थिती दाखवून नवे संकेत दिले आहेत की काय? पुणे महानगरपालिकेची नुकतीच झालेली प्रभाग रचना लक्षात घेता तीन दशक भारतीय जनता पक्षाचे काम निष्ठेने अन आपल्या कल्पकतेने करणाऱ्या गोरख दगडे यांनी पुणे महापालिकेचे रणशिंग फुंकले.

पुणे महापालिकेच्या वतीने मागील निवडणुकीच्या दरम्यान पक्षाच्या वतीने चारही जागा विजयी करण्यासाठी भरीव योगदान देणाऱ्या या कार्यकर्त्याने या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये,शारदीय नवरात्रोत्सव २०२५ घटस्थापना शुभहस्ते महायुतीचे आमदार मा. श्री. शंकरभाऊ मांडेकर यांच्या हस्ते साध्य करून नव संकल्प बांधला आहे. बावधन बुद्रुक व बावधन खुर्द या दोन्ही गावांमध्ये बावधन मार्केट यार्डच्या निमित्ताने नित्य संपर्क ठेवण्यात यशस्वी झाल्यानंतर, गोरख दगडे यांनी संघाची शाखा मार्केटमध्येच सुरू करून विचारांच्या प्रचाराची चळवळ कायम ठेवण्याचे काम केले आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

भारतीय जनता पक्षाचे काम करत असले तरी सुद्धा बावधन मधील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेल्या गोरख दगडे यांनी यंदा शारदीय नवरात्रोत्सव २०२५ च्या निमित्ताने सलोख्याचे वातावरण कायम ठेवल्याचे दिसत आहे. दररोजच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्वपक्षीय असलेले अनेक नेते आणि कार्यकर्ते यांना निमंत्रित केले जात आहे. यामध्ये प्रा. सविताताई सुहास दगडे (मा. जि. प. अध्यक्ष, पुणे) व श्री. सुहास विठ्ठल दगडे, श्री. गणेश दगडे, श्री. सुर्यकांत भुंडे, श्री. दिपक दगडे, प्रो. सचिन पानसरे, मनोहर दगडे, प्रदीप दगडे, श्री. राहूल दुधाळे (माजी सरपंच), श्री. अमोल मोकाशी (संचालक, मुळशी कृषी उत्पन्न बाजार समिती), श्री रोहिदास दगडे (उद्योजक), श्री. दत्तात्रय दगडे (माजी शिवसेना शाखाप्रमुख), सौ. रेखा दगडे, सौ. सर्वश्री सागर दगडे, सौ. प्रियांका अमोल साबळे, श्री. विक्रम मोकाशी, ऋषिकेश कांबळे, श्री. निलेश दगडे सौ. मेघा दगडे, श्री. अमर कोकाटे, श्री. अमित तोडकर, जितेश शेलार, ईरफान इजेरी (संचालक, बावधन मार्केट यार्ड) या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती देऊन संकल्पी घट बांधणीला शुभेच्छा अर्पण केल्याने नव उत्साह निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

मधुवंती बोरगावकर यांच्या भक्तिरंग… एक सुरेल संध्या कार्यक्रमात अनेक नागरिकांनी उत्साही सहभाग नोंदवला यावेळी निवेदिका सौ. शुभदा धामापूरकर यांनी भक्तीरसाला उच्च कोटीवर नेण्याचे काम केले. तसेच यापुढील काळात, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने विजयी चौकार साकार करणारे आमदार भिमराव तापकीर तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवक यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.